माझ्या काळाचा अनुवाद

माझ्या काळाचा अनुवाद

कोणत्याही चिकित्सेशिवाय समूहमनाला जे पटत आले आहे जे सहजपणे पटत आले आहे अशा विचारांना फाटे फोडणे, चिथावणे, खो घालणे, नाकारणे, गोंजारून गप्प करणे, डिवचून निरुत्तर करणे, त्यांच्याशी फारकत घेणे या तंत्रांनी काही प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा आश्चर्यकारक पण कालांतराने पटणारी नवीन विचारसंगती सापडत जाते. असे अनवट विचार आपल्याला सानेकरांच्या पुढील प्रभाषितांमध्ये सापडतात:

त्यातुनी येतो उजेडासारखा अंधार आता
या घराला लावली आहेत जी जी तावदाने

वैज्ञानिक प्रगतीचे, जे एकांगी मार्केटिंग सुरू आहे त्याला या अनवट विचाराने छेद दिला आहे.

जन्मभर करतात ते गुजराण अपुली शेवटावर
बनचुके करतात कुठलीही नवी सुरवात कोठे ?

पॅराडाइम शिफ्ट आणि लॅटरल थिंकिंग एकत्रही येऊ शकतात. यासाठी सानेकरांच्या अद्भुत प्रभाषिताचा उल्लेख करावासा वाटतो, तो शेर असा:

एक क्षण आकाश तेव्हा स्तब्ध झाले
एक उल्का चांदणी होणार होती !

(गझलसंग्रहातील 'काळ, अवकाश आणि कवितेचा शब्दट ह्या प्रा. अरुणोदय भाटकर ह्यांच्या चिंतनपर लेखातून)


माझ्या काळाचा अनुवाद
चंद्रशेखर सानेकर
ग्रंथाली
मूल्य ८० रूपये

पुस्तक जालावर इथे उपलब्ध आहे.

प्रतिसाद

निश्चितच सुंदर पुस्तक आहे. सानेकरांची कविता वैयक्तितरित्या मला फार आवडते. मराठी कविता पुढे नेण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांचा नव्या संग्रहाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. भाटकरांचे लिखाण फारच अभ्यासपूर्ण आहेच. नभाशी बोलण्यासाठी... या सानेकरांच्या संग्रहालादेखील त्यांचे टिपण आहे तेही अभ्यासपूर्ण व विचार करण्यासारखे आहे.
विश्वस्त जमल्यास ते व या पुस्तकातला लेख आपल्याला साइटवर देता येतील. त्यासाठी काय मदत लागेल ते कळवावे
धन्यवाद.

शेखर नविन सग्रहास शुभेछा!!!

सग्रहास सदिच्छा!!!