ये जवळ
Posted by वैभव देशमुख on Wednesday, 15 October 2008ये जवळ तुजला जरा
कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
गझल
ये जवळ तुजला जरा
कोणत्या गावातुनी आली हवा
का अशी वेडीपिशी झाली हवा
गाल हे पड्द्यामधे झाकून घे
उडवूनी नेईन ही लाली हवा
आग होती एवढीशी लागली
पण अचानक वाढली साली हवा
निर्मितो पाऊस गाणे लाघवी
लाविते अन रेशमी चाली हवा
लाभले तुजला जसे तारुण्य हे
भोवती पिन्गा तुझ्या घाली हवा
एवढा विश्वास तू ताकू नको
का कुनाची राहते वाली हवा.....
हृदय असते उगाचच!
=====================
लाज !
दु:ख दु:ख काय ?ते कशास बोलता?
वेदना जगास मी हजार मागतो
आटली नदी म्हणून गाव कोरडे
आसवे तुला जरा उधार मागतो
बिघडले आमचे साचे
धार्मिकतेच्या तटबंदीचा कोट मनातच...
विद्रोहाचा दारूगोळा...स्फोट मनातच...
सुंदर स्वप्नांच्या शापाने हुळहुळते जग...
चाटत बसते रोज मधाचे बोट मनातच...
केली नेत्यांनी गरिबांची चिंता जेव्हा..,
आशेनेही भरले त्यांचे पोट मनातच...
दांभिकतेचा, बेशिस्तीचा लोंढा आला,
विझवा सात्विक संतापाचे लोट मनातच
मौनामधुनी फुलवत जावे आठवणींना..,
स्वप्नांचीही बांधत जावे मोट मनातच...
डोळ्यांवरती झापड असते विश्वासाचे...,
दिसते कोठे..! मित्रांच्याही खोट मनातच...!
त्यांचे त्यांच्या लोकांशीही जमले नाही
प्रत्येकाने धरला गनिमी गोट मनातच
सवयीने मी घेतो आता थोडा थोडा
आकांक्षांच्याही नरडीचा घोट मनातच...
- प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर