हृदय असते उगाचच!

चला हृदयास आणू फिरवुनी रस्ते उगाचच
निरुद्योगी करे धंदे घरी नसते उगाचच


जणू माहीत नाही प्रेम आहे काय याला
हसे हज्जारदा झाले तरी फसते उगाचच


इथे संपूर्ण साली जिंदगी धोक्यात येते
तिला ना माहिती ती पाहुनी हसते उगाचच


कुठे केली प्रशंसा मी तिच्या कातिल रुपाची?
मला पाहूनही नुसतेच रसरसते उगाचच


कशाला ठेवशी देवास मी थकलो विचारुन
अरे बाबा नको रे हे हृदय असते उगाचच


किती सांभाळतो बेणे तरी सुधरेच ना ते
जरा आनंद झाला की असे डसते उगाचच ( मिरवायला रदीफ? )


तिलाही वाटते की स्पर्श व्हावे चोरटे पण
अशी बसते जवळ ती की जणू बसते उगाचच


अरे भरतोय ना वेड्या तुला विश्वास नाही?
इथे पेलाच लाजे हृदय फसफसते उगाचच ( मि. र. ? )


तशी ती थंड वाटे पाहताना, भेटताना
न जाणे का तिचे हे अंग कसकसते उगाचच?


कुणी घेऊन जा हृदयास माझ्या फालतू या
हवा आराम तेव्हा फार वसवसते उगाचच 


 


 



 


 


 


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

भुषणजी, डोंट माईंड. इस बार उतना मझा नही आया.
'बसते' आणि 'हसते' आवडला.
रदीफ '...मनातच'वरून  सुचला आहे का? 

ज्ञानेश,
अजिबात वाईट वाटले नाही.
उगाचच व मनातच - खरे तर 'उगाचच' मनात घोळत होता हे खरंय! पण 'मनातच' रचताना मात्र तो डोक्यात नव्हता. पण अनंत ढवळे कुठेतरी म्हणले होते त्याप्रमाणे काहीतरी मनात राहते अन ते गझलेत येते तसे झाले असावे. अर्थात हे सगळे लिहिताना संतोष कुलकर्णी व ढवळे यांच्याबद्द्ल पूर्ण आदर आहे. उगाचाच शी मनातच कधीच बरोबरी करू शकत नाही हे मान्य आहे.
Thank you for the response.

काहीतरी चुकले. मला असे म्हणायचे आहे की संतोष कुलकर्णी यांच्या गझलेशी माझ्या या गझलेची बरोबरी होऊच शकत नाही. त्यांचा ' मनातच' डोक्यात घोळत होता. पण 'उगाचाच' रचताना मात्र तो नव्हता.

खालचा शेर आणखी घोटला असता तर फर्मास झाला असता.
तिलाही वाटते की स्पर्श व्हावे चोरटे पण
अशी बसते जवळ ती की जणू बसते उगाचच
बाकी उगाचच लिहिले आहे.