बिघडले आमचे साचे

प्रयोगांचे बिघडलेले करावे काय हे साचे?
असा निर्माण झालो मी पहा हे न्याय देवाचे


दुधाला काय उकळ्या, झाकणे ही थडथडा वाजे
मनी इच्छा निघावी आणि चाले नृत्य देहाचे


किती लोकांस गेलो देत खांदा, ती कुठे आली?
मला नेण्यास आले हे बघा भलतेच लेकाचे


तसा मी वेगळा आतून, भासे वेगळा वरती
न हितसंबंध आम्ही तोडले कधि एकमेकाचे


असे सातत्य त्याला लाभते, जे पाहिजे आहे
बघा बदनाम झालो मद्य घेता नित्यनेमाचे


हजारो जाहली पापे, पुसाया जाब जे आले
न दुसर्‍यासारखे होते कधी आरोप एकाचे


कुणाला हे हवे आहे कुणाला ते हवे आहे
मला जो भेटतो तो उचलतो जे वाटले त्याचे


अरे कंत्राटदारा बांध माझे घर जसे वाटे
कवी तो जो सरळशा अंगणीही वाकडे नाचे


 


 


 


 


 


 


 





 

गझल: 

प्रतिसाद

कुणाला हे हवे आहे कुणाला ते हवे आहे
मला जो भेटतो तो उचलतो जे वाटले त्याचे
वाव्वा.. सुरेख शेर आहे..

श्री भटसाहेब,
आपला प्रतिसाद आला की मला वेगळाच आनंद होतो. धन्यवाद!

कुणाला हे हवे आहे कुणाला ते हवे आहे
मला जो भेटतो तो उचलतो जे वाटले त्याचे
अरे कंत्राटदारा बांध माझे घर जसे वाटे
कवी तो जो सरळशा अंगणीही वाकडे नाचे
कलोअ चूभूद्याघ्या

तू गप्प बस म्हणलास म्हणुन! नाहीतर म्हणलो असतो की तशी बरीय गझल! तिलकधारी गप्प हो पेक्षा खूपच बरीय!

दूध आणि "कुणाला हे हवे" हे शेर फार आवडले!
मनी इच्छा निघावी आणि चाले नृत्य देहाचे - वा वा!

कुणाला हे हवे आहे कुणाला ते हवे आहे
मला जो भेटतो तो उचलतो जे वाटले त्याचे

हा शेर मस्त आहे.