बिघडले आमचे साचे
Posted by भूषण कटककर on Monday, 13 October 2008
प्रयोगांचे बिघडलेले करावे काय हे साचे?
असा निर्माण झालो मी पहा हे न्याय देवाचे
दुधाला काय उकळ्या, झाकणे ही थडथडा वाजे
मनी इच्छा निघावी आणि चाले नृत्य देहाचे
किती लोकांस गेलो देत खांदा, ती कुठे आली?
मला नेण्यास आले हे बघा भलतेच लेकाचे
तसा मी वेगळा आतून, भासे वेगळा वरती
न हितसंबंध आम्ही तोडले कधि एकमेकाचे
असे सातत्य त्याला लाभते, जे पाहिजे आहे
बघा बदनाम झालो मद्य घेता नित्यनेमाचे
हजारो जाहली पापे, पुसाया जाब जे आले
न दुसर्यासारखे होते कधी आरोप एकाचे
कुणाला हे हवे आहे कुणाला ते हवे आहे
मला जो भेटतो तो उचलतो जे वाटले त्याचे
अरे कंत्राटदारा बांध माझे घर जसे वाटे
कवी तो जो सरळशा अंगणीही वाकडे नाचे
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
मंगळ, 14/10/2008 - 19:28
Permalink
मला जो भेटतो तो उचलतो जे वाटले त्याचे
कुणाला हे हवे आहे कुणाला ते हवे आहे
मला जो भेटतो तो उचलतो जे वाटले त्याचे
वाव्वा.. सुरेख शेर आहे..
भूषण कटककर
मंगळ, 14/10/2008 - 20:33
Permalink
वेगळा आनंद.
श्री भटसाहेब,
आपला प्रतिसाद आला की मला वेगळाच आनंद होतो. धन्यवाद!
अजय अनंत जोशी
मंगळ, 14/10/2008 - 22:25
Permalink
जे वाटले त्याचे
कुणाला हे हवे आहे कुणाला ते हवे आहे
मला जो भेटतो तो उचलतो जे वाटले त्याचे
अरे कंत्राटदारा बांध माझे घर जसे वाटे
कवी तो जो सरळशा अंगणीही वाकडे नाचे
कलोअ चूभूद्याघ्या
तिलकधारीकाका
मंगळ, 14/10/2008 - 22:58
Permalink
गप्प.
तू गप्प बस म्हणलास म्हणुन! नाहीतर म्हणलो असतो की तशी बरीय गझल! तिलकधारी गप्प हो पेक्षा खूपच बरीय!
पुलस्ति
बुध, 15/10/2008 - 00:17
Permalink
दूध आणि
दूध आणि "कुणाला हे हवे" हे शेर फार आवडले!
मनी इच्छा निघावी आणि चाले नृत्य देहाचे - वा वा!
ॐकार
गुरु, 16/10/2008 - 21:33
Permalink
कुणाला हे हवे आहे कुणाला ते हवे आहे
कुणाला हे हवे आहे कुणाला ते हवे आहे
मला जो भेटतो तो उचलतो जे वाटले त्याचे
हा शेर मस्त आहे.