गझल

गझल

शब्दवीर...

शब्दवीर... (गझल)

संवाद साधण्याला, थोडा उशीर झाला...
अन् धुंद श्वास माझा, आता फकीर झाला...

वाळूत रेखिले मी, सौंदर्य 'अमृता'चे...
सामावण्यास तिजला, सागर अधीर झाला...
( ज्या मुलीसाठी मी काव्य रचतो तिचे नाव 'अमृता' आहे. )


स्वर्गीय देवतांनी, अमुच्यात फूट केली...
हा कालिदास 'काफर', मुस्लीम 'मीर' झाला!

पाठीत घाव करणे, मोठी 'कला'च आहे!
तो कालचा शिपाई, झटकन 'वजीर' झाला!!!

गझलेतल्या नशेने, जो चिंबलाच नाही...
कोणी कुठे असाही, का 'शब्दवीर' झाला???

- निरज कुलकर्णी.

गझल: 

प्रश्न...

मायबोली संकेतस्थळावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेत लिहिलेली गझल.

धुळीत ह्या पाऊल जराही मळले नाही
असा चाललो! वाटेलाही कळले नाही

भेट न व्हावी - हे ना जमले कधी तुलाही
तू टाळावे हे मजलाही टळले नाही

पोटाला जे चटके बसले, कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही!

फिरवत बसलो जाते, पण मी काय मिळवले?
ना ओवीही सुचली... काही दळले नाही

काय वेगळे घडते जर भेटलोच नसतो?
ह्या प्रश्नाने सांग तुलाही छळले नाही?

~ नचिकेत

गझल: 

Pages