प्रश्न...

मायबोली संकेतस्थळावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेत लिहिलेली गझल.

धुळीत ह्या पाऊल जराही मळले नाही
असा चाललो! वाटेलाही कळले नाही

भेट न व्हावी - हे ना जमले कधी तुलाही
तू टाळावे हे मजलाही टळले नाही

पोटाला जे चटके बसले, कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही!

फिरवत बसलो जाते, पण मी काय मिळवले?
ना ओवीही सुचली... काही दळले नाही

काय वेगळे घडते जर भेटलोच नसतो?
ह्या प्रश्नाने सांग तुलाही छळले नाही?

~ नचिकेत

गझल: 

प्रतिसाद

धुळीत ह्या पाऊल जराही मळले नाही
असा चाललो! वाटेलाही कळले नाही ( उत्तम मतला )

मला अशा गझला तुलनेने आवडतात.

भेट न व्हावी - हे ना जमले कधी तुलाही
तू टाळावे हे मजलाही टळले नाही ( याचा अर्थ मात्र नीट समजला नाही )

पोटाला जे चटके बसले, कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही! ( उत्तम )

फिरवत बसलो जाते, पण मी काय मिळवले?
ना ओवीही सुचली... काही दळले नाही ( चांगला )
 


काय वेगळे घडते जर भेटलोच नसतो?
ह्या प्रश्नाने सांग तुलाही छळले नाही? ( उत्तम )

धुळीत ह्या पाऊल जराही मळले नाही
असा चाललो! वाटेलाही कळले नाही

तसेच

पोटाला जे चटके बसले, कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही!

फार आवडले...

सगळेच शेर झकास आहेत. कुठला सांगायचा?

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार!

छान !
पोटाला जे चटके बसले, कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही!

ध्न्यवाद, निलय.

शेर चांगले आहेत.
मतला आणि सरपण विशेष.
कलोअ चूभूद्याघ्या

सगळेच उत्तम. सरपण खास.

धुळीत ह्या पाऊल जराही मळले नाही
असा चाललो! वाटेलाही कळले नाही
वाव्वा.. गझल चांगली झाली आहे.  मळणे ह्या क्रियापदाचे दोन्ही अर्थ (१. वाट मळणे २. विजार मळणे) चांगले आले आहेत.

व्वा...छान..
धुळीत ह्या पाऊल जराही मळले नाही
असा चाललो! वाटेलाही कळले नाही

अजय, कौतुक, चित्तरंजन, दशरथयादव,

प्रतिसादांबद्दल आभार!

जुल-काफिया गझल लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता. सगळ्यांच्या प्रतिसादाने प्रोत्साहन मिळाले.

पुन:श्च धन्यवाद!!

~ नचिकेत

काय वेगळे घडते जर भेटलोच नसतो?
ह्या प्रश्नाने सांग तुलाही छळले नाही?

पोटाला जे चटके बसले, कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही

काय वेगळे घडते जर भेटलोच नसतो?
ह्या प्रश्नाने सांग तुलाही छळले नाही?
 वा!