फक्त येवढा तिचा ...
फक्त येवढा तिचा विचार मागतो
मी मनास प्रेम हा विकार मागतो
दु:ख दु:ख काय ?ते कशास बोलता?
वेदना जगास मी हजार मागतो
आटली नदी म्हणून गाव कोरडे
आसवे तुला जरा उधार मागतो
आरश्यास तोडतात लोक आजचे
मी मलाच आज आर्-पार मागतो
एकदा मला बघून कापल्या व्यथा
आज ही सुर्यास तीच धार मागतो
--------------स्नेहदर्शन
गझल:
प्रतिसाद
गंभीर समीक्षक
मंगळ, 14/10/2008 - 22:17
Permalink
समीक्षा
मतल्यामधे कवी एका प्रेमिकाच्या भावना फार तीव्रपणे मांडत आहे. प्रेम हा एक रोग आहे हे त्याला मुळातच माहिती आहे. ही तशी श्रेष्ठ भावना म्हणता येईल.
दुसर्या शेरात त्याने जे सांगीतले आहे ती अनुभुती म्हणता येईल. मला फक्त दु:खच मिळाले हे बघून आता मी स्वतःच फक्त दु:खच मागत आहे. वास्तवाचे दर्शन होते.
तिसरा शेर फार छान अर्थाचा आहे. नदी आटली म्हणुन गाव कोरडा असताना कवी प्रियेकडे किंवा देवाकडे अश्रू उधार मागतोय. फार श्रेष्ठ विचार.
चौथा शेर कडी आहे. मला स्वतःला हे कळावे की मी नेमका काय आहे म्हणुन मी स्वतःला आरपार मागत आहे.
पाचवा शेर आणखीन दर्जेदार परंतू उर्दू पद्धतीचा आहे. मला बघून दु:खच घाबरली असा त्याचा अर्थ होईल.
एकंदर ही एक व्यथामांडणी म्हणता येईल जो खरे तर गझलेचा आत्मा धरला जातो.
रचना वृत्तबद्ध आहेच. अजून वाढवता येईल. स्पेसिफिक उदाहरणांनी अशा रचना फार महान होऊ शकतात.
१०० पैकी - ४०
पुलस्ति
बुध, 15/10/2008 - 06:58
Permalink
नदी
शेर फार आवडला!
तिलकधारीकाका
गुरु, 16/10/2008 - 05:00
Permalink
गप्प
वेळ मिळाल्यास आरपार या शेराचा अर्थ सांगावा अशी अतिनम्र विनंती. ( गंभीर समीक्षकांना जो अर्थ वाटला आहे तोच आहे का? ) धार शेर चांगला आहे आणि मी गप्प आहे.
सन्तोश (not verified)
गुरु, 16/10/2008 - 16:25
Permalink
गझल
मला गझल खुप आवदलि
अजय अनंत जोशी
गुरु, 16/10/2008 - 16:31
Permalink
नदी
पुलस्तीशी सहमत.
आटली नदी म्हणून गाव कोरडे
आसवे तुला जरा उधार मागतो
कलोअ चूभूद्याघ्या
ॐकार
गुरु, 16/10/2008 - 21:25
Permalink
अजून वाट पहायला हवी होत
प्रकाशित करायला अजून वाट पहायला हवी होती. गझल परिणामकारक वाटली नाही.
स्नेहदर्शन
रवि, 19/10/2008 - 09:09
Permalink
आर्-पार
मला असे म्हणायचे आहे की आरसा सत्य सांगतो (जो है -वो है) पण त्याचे बोलणे आज लोकांना सहन होत नाही,म्हणून माझी पारदर्शता मी मागतो. मी काय आहे ते सहज कळण्यासाठी (जो है -वो है) म्हणजे मला जाणून घ्यायला फक्त माझ्यात बघा