तू ...
Posted by अजय अनंत जोशी on Tuesday, 27 January 2009पुरे जाहले चांदणे पाहणे..
असे रोज एकेकटे जागणे
दंतकथा मी ऐकत फिरलो
वाटेवर इतिहास मिळाला
गझल
पुरे जाहले चांदणे पाहणे..
असे रोज एकेकटे जागणे
ओठातुन माझ्या शब्द सांडतो आहे..
अन् अर्थ तयाचा माग काढतो आहे
विचाराधीन मन
वाटतो सार्या सुखांचा धाक आता
सुख म्हणाले की रगडतो नाक आता
वायदे करती हजारो पाळणारे शोधतो
माणसाला माणसागत मानणारे शोधतो
बोलणारे भेटले अन् ऐकणारे भेटले
बोलल्याविण अंतरीचे जाणणारे शोधतो
दोन शोधा चार मिळती सूख असता सोबती
दु:खही दिसता जरासे थांबणारे शोधतो
बाह्यरुपाला बघोनी लायकी ठरते जिथे
कातडीच्या आतलेही पाहणारे शोधतो
जाहल्या जखमा कहाण्या यातना झाल्या जुन्या
मी नव्याने घाव आता घालणारे शोधतो
नीज येता पाहणे स्वप्ने सुखाने रोजचे
घेउनी स्वप्ने उराशी जागणारे शोधतो
अंत येता ढाळण्याला आसवे कोणी नको
आज मी पार्थिव माझे जाळणारे शोधतो
जगदिश
चेहरा सारे खरे ते सांगतो
याचसाठी आरसा मी टाळतो
फालतूपणा
काय सांगू कसे मी कुणाला?
भ्यायले चांदणे गारठ्याला