तू ...

पुरे जाहले चांदणे पाहणे..
असे रोज एकेकटे जागणे


उले फूल पानातुनी गोजिरे..
तसे ओठ उमलुन तुझे हासणे


जसा सूर्य संध्येस रेंगाळतो..
मनाचे मनाशी तुझे बोलणे


कशाला हवी व्यर्थ मद्यालये ?
तुला पाहणे अन् नशा साधणे


पुरे जाणतो मी, मला पाहुनी..
तुझे आतल्या आत ओशाळणे


नभी तारकांना चमकण्या अता..
मिळे ताल बघुनी तुझे चालणे

गझल: 

प्रतिसाद

पुरे जाहले चांदणे पाहणे..
असे रोज एकेकटे जागणे


उले फूल पानातुनी गोजिरे..
तसे ओठ उमलुन तुझे हासणे


जसा सूर्य संध्येस रेंगाळतो..
मनाचे मनाशी तुझे बोलणे


कशाला हवी व्यर्थ मद्यालये ?
तुला पाहणे अन् नशा साधणे

अजय,
मद्यालये व्यर्थ? मग सगळेच व्यर्थ!
हा हा!
आवडली गझल!

तसे ओठे उमलुन हे छान वाटले.

तारकांना चमकण्यासाठी तालाची आवश्यकता अस्ते का? त्यांचे चालणे की नुसतेच चमकणे. तरी सुनेत्रा म्हणते त्याप्रमाणे सुरेख.

सुनेत्रा, भूषण, गौतमी, अर्चना आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या