धाक

वाटतो सार्‍या सुखांचा धाक आता
सुख म्हणाले की रगडतो नाक आता


प्रेम,माणुसकी,दया ,शांती ,अहिंसा
पाक गोष्टी कालच्या नापाक आता


स्वार्थ दिसता माणसाचे तत्व बदले
रोज येथे जन्मती चार्वाक आता


का असा हटवाद पाठीच्या कण्याचा?
विनवले कित्येकदा की वाक आता


दृष्ट ना लागो किती नाजूक,सुंदर
स्वप्न हळवे पापण्यांनी झाक आता


जर विकायाचाच आहे देश अवघा
का कुणी व्हावे शहिद हकनाक आता


'तो' नऊवेळा म्हणे येऊन गेला
पण कुणाची  'तो'  न ऐके हाक आता

गझल: 

प्रतिसाद

दृष्ट ना लागो किती नाजूक,सुंदर
स्वप्न हळवे पापण्यांनी झाक आता

'तो' नऊवेळा म्हणे येऊन गेला
पण कुणाची  'तो'  न ऐके हाक आता..
बेजकर साहेब, तो नक्की येईल दहाव्यांदा....जरा वाट बघा..
'यदा यदा हि धर्मस्य' हे वचन तो कसा विसरेल बरे?
(मतला नीट कळला नाही)
-मानस६

स्वार्थ दिसता माणसाचे तत्व बदले
रोज येथे जन्मती चार्वाक आता
का असा हटवाद पाठीच्या कण्याचा?
विनवले कित्येकदा की वाक आता
दोन्ही सुंदर.
जर विकायाचाच आहे देश अवघा
का कुणी व्हावे शहिद हकनाक आता      सुंदर.
इथे एक बदल सुचवावासा वाटतो.  'शहिद हक' सलग ५ लघु.
का शहिद व्हावे कुणी हकनाक आता        .... असे मला सुचले ते सांगितले.
कलोअ चूभूद्याघ्या

सुंदर आहे रचना.
शहिद वाला शेर मस्त आहे, त्यामधे केलेला मा. अजय जोशी यांचा छोटासा बदलही आवडला
 

 
व्वा..छान्..जमलाय्..
शेर आता

दृष्ट ना लागो किती नाजूक,सुंदर
स्वप्न हळवे पापण्यांनी झाक आता

जर विकायाचाच आहे देश अवघा
का कुणी व्हावे शहिद हकनाक आता

स्वार्थ दिसता माणसाचे तत्व बदले
रोज येथे जन्मती चार्वाक आता


पाठीचा कणा जबरदस्त शेर !