धोका
Posted by क्रान्ति on Sunday, 7 February 2010हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका
बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका
हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!
मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता !
हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका
बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका
हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!
म्हणाली बाटली, "तोंडास त्याच्या वास का येतो"?
सकाळी शेण खाल्ल्याचाच तो आभास का होतो?
जरा पोटात ती गेल्यावरी लाडात का येतो?
चणे, दाणे, मसाले खाउनी तो त्रास का देतो?
जे आपले त्यांनीच हो दारात लाजच काढली
ती काय झाली चूक, ह्या नादात रात्रच काढली
माझी कशी ती योग्य मापे आज त्यांनी काढली
जी मारली चप्पल मला, पायात छानच मावली
तू जरा पाने मनाशी चाळ माझी
अक्षरे हृदयातली रक्ताळ माझी
तूच तू माझ्यात अन् बाहेर माझ्या
ऊन्ह तू तू सावली पानाळ माझी
मी तुझ्या केसातला गजरा सुगंधी
तू मिठी वार्या तली केसाळ माझी
कोणती धुंदी चढावी काळजावर ?
ना तसे काळीज उरले धुंदल्यावर..
लढ जसे तू पाहिजे पण काळजी घे..
आपला फासा न यावा... आपल्यावर
'सांगणे त्याने घराणे बंद केले...'
स्वप्न ही पडतात हल्ली जागल्यावर
काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४४वे वार्षिक स्नेहसंमेलन
(रविवार दि. १४ फेब्रुवारी २०१०)
स्थळ: डॉ. आंबेडकर सभागृह, कल्याण-डोंबिवली महापालिका इमारत, डोंबिवली (पूर्व)
लोक म्हणाले नियतीचा तो डावच खासा होता
माझे दान उधळले, तुझिया हाती फासा होता
काल तुझ्यालेखी माझ्य़ा त्या ओळी अमूल्य होत्या
आज तुझ्यालेखी माझा तो फ़क्त खुलासा होता
सुरेश भट
चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला
काय तो वेडा इथेही बोलला?
हा शहाणाही चळाया लागला
ओठ ओठांना सतावू लागले
श्वास गालाला छळाया लागला