रुतावे कुठे
Posted by जयश्री अंबासकर on Monday, 1 February 2010न काट्यास कळले सलावे कुठे
रुतावे कुठे अन दुखावे कुठे
विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे
बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे
उरी वेदना, हास्य गालावरी
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
न काट्यास कळले सलावे कुठे
रुतावे कुठे अन दुखावे कुठे
विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे
बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे
उरी वेदना, हास्य गालावरी
वृत्तः आनंदकंद (गागालगा लगागा)
गुंतून मी पडावे की सोडवून घ्यावे
खड्गास या दुधारी सांगा कसे धरावे
गोडीत त्या गुलाबी गंधात धुंद झालो
बंदीस्त पद्मकोशी सांगा कसे सुटावे
sureshbhat.in या संकेतस्थळावर मला जवळपास दोन वर्षें होतील. सुरेश भट आणि त्यांच्यासंबंधी बर्याच गोष्टी वाचायला - अभ्यासायला मिळाल्या. केवळ रदिफ-काफिया घेऊन गझल करता येत नाही. त्यातील बाह्यतंत्र आणि आंतरिक तंत्र या दोनही गोष्टींवर चर्चा ऐकायला/वाचायला आणि अर्थातच करायला मिळाल्या. सुरेश भटांचे काव्य हे गझलकारांना एक प्रेरणास्त्रोत असते हे अनुभवायला मिळाले. गझल कशी करावी या बरोबरच त्यातील भाव कसा उलगडावा हेही शिकायला मिळाले. तसे, शिकविणारे अनेक भेटले पण इथे मिळाले ते भावले.
संपता संपेचना कल्लोळ ह्या देहातला
ऐकला नाहीच मी आवाज कारण आतला
एकदा केली मनावर मात मेंदूने जरा
तेवढ्यानेही किती आयुष्यभर तो मातला
आज साक्षात्कार झाला; जग असे का वागते?
(वृत्त - मनोरमा - गालगागा गालगागा)
पोळलेल्या काळजाला
द्या दिलासा वादळाला.
पोर छोटा पोहताना
पार गेला... हो तळाला.
ढोल वाजे भावनांचा
साथ देतो गोंधळाला.
सावजाला शोधताना
गुंतवू नकोस.... देह ठेवला असेल तर
मी उगाच एक डाव खेळला असेल तर?
कारणास कारणे नि त्यांस कारणे पुन्हा
मूळ शोधण्यास जीव नेमला असेल तर?
काय माहिती ... जिला नमेन त्याच मूर्तिने
जे आपले त्यांनीच हो चौघात लाजच काढली
ती कोणती जी चूक ह्या शोधात रात्रच काढली
माझी कशी ती योग्य मापे आज त्यांनी काढली
जी मारली चप्पल मला, पायात छानच मावली
बांधण प्रतिष्ठानचा जीवन-गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ्य गझलकार श्री.वा.न.सरदेसाई ह्यांचा जाहीर सत्कार काव्य-किरण मंडळ, कल्याण ह्यांच्यातर्फे दि ७-२-२०१० रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याच दिवशी त्यांचा 'हृदयाचा उद्गार गझल 'हा गझल सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, आणि सर्व काव्य-प्रेमींनी आवर्जून उपस्थित रहावे असे काव्य किरण मंडळाचे अध्यक्ष श्री. यशवंत वैद्य ह्यांनी कळविले आहे.
स्थळ- ओक हायस्कूल, दता-आळी, कल्याण(पश्चिम)
वेळ- सायंकाळी ५-३० वाजता
-मानस६