छान रमल्यासारखे

वागतो आहोत वादळ पूर्ण शमल्यासारखे
भासतो आहोत आपण छान रमल्यासारखे

भांडणे डोळ्यांमधे येतात लाटांसारखी
ओठ भासवतात पण सागर नरमल्यासारखे

एकमेकांच्याविना ताजेतवाने एरवी

गझल: 

पाहुनी तुला

पाहुनी तुला खुलेल ही कळी
चेह-यावरी पडेलही खळी

आज ये निवांत भेटण्यास तू
आज मी घरी बरीच मोकळी

ये नि फक्त स्पर्श कर जरा मला

गझल: 

आभास मीलनाचा..

आभास मीलनाचा..

केंव्हा तरी कशाचा हलकेच भास झाला
आभास मीलनाचा पळभर मनास झाला

शून्यात पाहतांना हळुवार लाजली तू
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला

गझल: 

छल्ला

आठवण म्हणुनी मिळाला एक छल्ला
आणि ’विसरावे’ असा जोडीस सल्ला

अर्थ ’नाही’चा अता ’नाही’च आहे
मारला आहेस तू भलताच पल्ला

माणसांना देव खपवावा जरासा
देवळामध्ये कसा निर्धास्त गल्ला

गझल: 

सस्नेह आमंत्रण - गझल सहयोगचा मुशायरा - नभाचे शब्द स्वच्छंदी

'गझल-सहयोग' या उपक्रमात मराठी गझल संदर्भात खारीचा वाटा उचलला जात आहे. गझल तिहाई च्या वृत्तांतात नमूद केल्याप्रमाणे फेब्रुवारीत मुशायरा घेण्यात येत आहे. सर्वांना मनापासून सस्नेह आमंत्रण!

तपशीलः

आगामी कार्यक्रम: 

व्यथा

व्यथा

जितके जमेल तितके अडवीन मी व्यथांना
नाहीच ऐकले तर बडवीन मी व्यथांना

केला प्रयास जर का त्यांनी लढावयचा...
नक्की क्षणाक्षणाला रडवीन मी व्यथांना

गझल: 

खोटे असते हळहळणे

खोटे असते हळहळणे
खरे आतले मळमळणे

कधीच मी सोडून दिले
तुझ्यावाचुनी तळमळणे

सहन कसे मी करू प्रिये..
फुकट कुणाचे सळसळणे ?

मीठ असो किंवा साखर
दुधात असते विरघळणे

बातमी तशी खोटी, पण...

गझल: 

तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा

तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा

तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी अंतर कधी लाटा

गझल: 

Pages