विचारीन पांढर्या छडीला...
विचारीन पांढर्या छडीला...
कुठे होतीस तू जेव्हा दिशा झंकारल्या होत्या ?
कुठे गेलीस तू जेव्हा ऋतू गंधाळुनी गेले ?
मान्यवरांची गझल
विचारीन पांढर्या छडीला...
माझिया सवेच मी बोलते कधी कधी
बोलण्यातही तुला ऐकते कधी कधी
आरश्यात शोधते मी तुझाच चेहरा
हासते कधी कधी लाजते कधी कधी
टाळुनी तुला जरी दूर दूर चालले
सावली तुझी मला भेटते कधी कधी
मागते न मी तुला तारका नभातल्या
आपुलेच श्वास मी मागते कधी कधी
कोणत्याच अंगणी मी न वेचली फुले
अंतरात मी तुला वेचते कधी कधी
एकटेपणातही स्पर्श जाणवे तुझा
आसपास मी तुला पाहते कधी कधी
जागते अजूनही चांदणे मिठीतले
रात्र आपुली अशी रंगते कधी कधी
उपकार आसवांचे ... हसतो अजूनही मी
आभार जीवनाचे.... जगतो अजूनही मी
मद्यालयात जातो, मी सांजवेळ होता
गहिर्या नशेतही तुज, स्मरतो अजूनही मी
मज चेहराच हसरा, आहे असा मिळाला
त्या चेहर्यात माझ्या, दडतो अजूनही मी
माझी-तुझी कहाणी सरली अजून कोठे ?
त्या आसवात तुझिया, झरतो अजूनही मी
दिन चालले असे अन वय वाढते असे हे
तू भेटता परंतू... चळतो अजूनही मी