चळ
उपकार आसवांचे ... हसतो अजूनही मी
आभार जीवनाचे.... जगतो अजूनही मी
मद्यालयात जातो, मी सांजवेळ होता
गहिर्या नशेतही तुज, स्मरतो अजूनही मी
मज चेहराच हसरा, आहे असा मिळाला
त्या चेहर्यात माझ्या, दडतो अजूनही मी
माझी-तुझी कहाणी सरली अजून कोठे ?
त्या आसवात तुझिया, झरतो अजूनही मी
दिन चालले असे अन वय वाढते असे हे
तू भेटता परंतू... चळतो अजूनही मी
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
विसुनाना
गुरु, 03/05/2007 - 11:38
Permalink
वा!
ही गझल अगदी खरीखुरी व्यथा व्यक्त करते.
सारेच शेर अप्रतीम आणि सहज.
वा! (आणि नंतर काही काळ स्वतःतच बुडून गेलो.)
समीर चव्हाण (not verified)
गुरु, 03/05/2007 - 13:24
Permalink
साधी आणि सुंदर गझल
फारच आवडली गझल
चित्तरंजन भट
गुरु, 03/05/2007 - 13:35
Permalink
सहमत आहे
गझल साधी, सोपी, सहज, सुंदर!
राजदूत
गुरु, 03/05/2007 - 15:07
Permalink
चळ
वाहवा माझ्यासारख्या मद्यप्याला आवडली. मतला बरा वाटत नाही.
ह बा
शनि, 05/06/2010 - 16:26
Permalink
आवडलेले शेर : मज चेहराच हसरा,
आवडलेले शेर :
मज चेहराच हसरा, आहे असा मिळाला
त्या चेहर्यात माझ्या, दडतो अजूनही मी
दिन चालले असे अन वय वाढते असे हे
तू भेटता परंतू... चळतो अजूनही मी
प्रणव.प्रि.प्र
शुक्र, 11/06/2010 - 17:31
Permalink
वैयक्तितदृष्टिकोनातून
वैयक्तितदृष्टिकोनातून स्पष्टपणे सांगायचे कविता अजिबात आवडली नाही.
प्रशान्त वेळापुरे
मंगळ, 15/06/2010 - 12:49
Permalink
मद्यालयात जातो, मी सांजवेळ
मद्यालयात जातो, मी सांजवेळ होता
गहिर्या नशेतही तुज, स्मरतो अजूनही मी ---छान!
दिन चालले असे अन वय वाढते असे हे
तू भेटता परंतू... चळतो अजूनही मी-----
शेर आवडले