क्षण चालले...
क्षण चालले, दिन चालले, अन् चालले आयुष्यही
जगणे न हे जगणे मुळी, ना खेदही ना खंतही
आकाश हे माथ्यावरी, आहे जसे, होते तसे
येतात अन् जातातही, घन सावळे, घन शुभ्रही
इतुके कसे हे एकसे , दिसतात सारे सोबती
हे चेहरे आहेत अन् हे चेहरे नाहीतही
या चुंबनातुन कोण ते, तू जहर हे आहे दिले ?
फुलते कसे गाणे पुन्हा, ह्या पोळल्या ओठातही ?
क्षण चालले, दिन चालले.... पण थांबलो मागेच मी
आता नको, ठेऊस तू, मजला तुझ्या स्मरणातही
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 23/04/2007 - 13:46
Permalink
हे चेहरे आहेत अन्
हे चेहरे आहेत अन् हे चेहरे नाहीतही, सुंदर मिसरा. गझल आवडली, डबीरसाहेब.
yogesh parvate (not verified)
शनि, 21/07/2007 - 18:36
Permalink
प्रतिसाद - क्षण चालले
खुपच सुन्दर गझल
मी ह्याला चाल लावू का?
योगेश पर्वते
समीर चव्हाण (not verified)
सोम, 26/01/2009 - 10:36
Permalink
छान
आकाश हे माथ्यावरी, आहे जसे, होते तसे
येतात अन् जातातही, घन सावळे, घन शुभ्रही
मानस६
सोम, 26/01/2009 - 23:03
Permalink
इतुके कसे
इतुके कसे हे एकसे , दिसतात सारे सोबती
हे चेहरे आहेत अन् हे चेहरे नाहीतही... क्या बात है...
मक्ता ही सुंदर
-मानस६
प्रसन्न शेंबेकर
बुध, 15/04/2009 - 14:54
Permalink
क्या बात
क्या बात है ! ह्याला म्हणतात गझल !! जरी ह्या ओळींमध्ये "पंच" नसला तरी , अंतर्मुख करण्याची सुंदर क्षमता आहे.
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"