वादात या कुणीही सहसा पडू नये
Posted by क्रान्ति on Sunday, 20 February 2011येते मनात ते का सारे घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
वाटा नव्या जगाच्या हाकारती मला,
पाऊल टाकले ते जागी अडू नये!
आनंदसोहळ्याला हे दार वर्ज्य का?
का नौबती सुखाच्या येथे झडू नये?