तरही गझल

तरही गझल

राहिले रे अजून श्वास किती ?*

* राहिले रे अजून श्वास किती ?
जीवनाची कथा उदास किती


दूर गेलीस तू.. निघून जरी...
दरवळे गंध... आसपास किती


चौकटीचे कुठे असे.. जगणे...
जीवनाला परीघ्-व्यास किती


गंध गेला... उडून पार जरी...
मी जपावे जुन्या फुलास किती ?


ऐकतो... पाहुण्यांस मान इथे
बंद दारेच स्वागतास किती !


सूर माझ्यामधून... दूर अता...
आळवू मी तरी सुखास किती ?

Taxonomy upgrade extras: 

Pages