माझाच व्हावा मला नित्य आधार
Posted by अजय अनंत जोशी on Sunday, 11 April 2010कोठे मिळावा प्रकाशात शेजार
कोठे उरावा मनाचाच अंधार
का जात नाही अता सूर्य अस्तांस ?
मोजून केला कुठे आज शृंगार...
राजा निघाला गुन्हे संपवायास...
त्याचे गुन्हे मोजण्या कोण येणार ?