सस्नेह आमंत्रण - गझल सहयोगचा मुशायरा - हे गाव आपल्यांचे

सस्नेह आमंत्रण

बेफ़िकीर, अजय जोशी व डॊ.अनंत ढवळे सादर करत आहेत..

गझल सहयोगचा चवथा द्विमासिक मराठी गझल मुशायरा

हे गाव आपल्यांचे

वेळ - सायंकाळी ५.४५ ते सायंकाळी ७.४५
वार - रविवार

आगामी कार्यक्रम: 

श्वास झालो

मी कळ्यांचा श्वास झालो
की फुलांचा वास झालो

ह्या सुगंधा चाखताना
भ्रुंग मी नावास झालो

सावलीला सोडले मी
मी उन्हाचा त्रास झालो

पाहता ती मुग्ध अदा
आज तीचा दास झालो

वाढली ती हाव माझी

गझल: 

हेच असे असते जगणे...

हेच असे असते जगणे
जे घडते नुसते बघणे

हे न कधीच कुणा सुटले
भास उगाचच पांघरणे

ध्यास कुणास बघा असतो...
'ठेच उरातच बाळगणे'

सत्य मनास पटेल कसे ?
फक्त हवे जर थोपटणे

व्यर्थ ठरेल उगीच अता

गझल: 

..काय मी

माझे मला ना कळे, केले काय मी?
त्या पायरीशी कसे नेले पाय मी

का चोरला घास माझ्या त्यागातला?
ते ताक होते जळालेले, साय मी!

ना राहिली ओढ, भेटू कोणास मी?
माझ्याकडे ओढले गेले काय मी?

गझल: 

छानपैकी जगून गेलो मी.....

छानपैकी जगून गेलो मी
छान होतो... म्हणून गेलो मी

प्यायलो कोळुनी विषय सारे
फक्त डोक्यावरून गेलो मी

चेहरा खूपसा बदललेला
काल माझ्यापुढून गेलो मी

ती दिसावी म्हणून गेलो.. पण..

गझल: 

रहस्ये गाडली गेली तळाशी

रहस्ये गाडली गेली तळाशी..

कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली गेली तळाशी..

मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..

*कुठे टिंबे, रिकामी ओळ होती...

गझल: 

अधाशी....

खात आहे अधाशी किती....?
वेदने तू उपाशी किती....?

काय संकोच गेला कुठे...?
लाजली तू मघाशी किती....?

चारचौघीतही शांत तू....
बोलते पण स्वतःशी किती....!

घातले घास खाऊ मला..

गझल: 

Pages