ही दुनिया घालत आहे कसले हे नवीन कपडे

ही दुनिया घालत आहे कसले हे नवीन कपडे
ती जे जे झाकत होती ते टाकी आता उघडे

जे रणांगणावर होते त्यांनी समझोते केले
जे छावणीत बसलेले ते करू लागले झगडे

म्हणून माझी झेप कधी उंच जाऊ शकली नव्हती

म्हणून माझी झेप कधी उंच जाऊ शकली नव्हती
कारण माझ्या पायतळीची जमीन खचली नव्हती

कसे म्हणू की मी माझ्या मर्जीचा मालक होतो
तुझ्या कैदखान्याची मज हद्दच कळली नव्हती

निवेदन: दिवाळी अंक २००८

ह्यावर्षीपासून आपल्या संकेतस्थळातर्फे दिवाळी अंक (पीडीएफ आणि एचटीएमएल स्वरूपांत) काढण्याचे ठरवले आहे. ह्या अंकासाठी गझला आणि गझलविषयक लेख स्वागतार्ह आहेत. diwaliank@sureshbhat.in ह्या पत्त्यावर आपले साहित्य पाठवावे. प्रकाशनयोग्य गझलांना आणि लेखांना प्रसिद्धी ह्या अंकात प्रसिद्धी देण्यात येईल.

तसेच अंकाबाबत आपल्या शंका, मते मांडायची असल्यास प्रतिसादांतून ती जरूर मांडावीत.

Pages