निवेदन: दिवाळी अंक २००८

ह्यावर्षीपासून आपल्या संकेतस्थळातर्फे  दिवाळी अंक (पीडीएफ आणि एचटीएमएल स्वरूपांत) काढण्याचे ठरवले आहे. ह्या अंकासाठी गझला आणि गझलविषयक लेख स्वागतार्ह आहेत. diwaliank@sureshbhat.in ह्या पत्त्यावर आपले साहित्य पाठवावे. प्रकाशनयोग्य गझलांना आणि लेखांना प्रसिद्धी ह्या अंकात प्रसिद्धी देण्यात येईल.

तसेच अंकाबाबत आपल्या शंका, मते मांडायची असल्यास प्रतिसादांतून ती जरूर मांडावीत.

प्रतिसाद

sureshbhat.in च्या वतीने यंदाच्या दिवाळीत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या ऑनलाईन दिवाळी अंकाला माझ्या मनापासून शुभेच्छा...या अंकासाठी दर्जेदार, कसदार, अस्सल मराठी गझला, गझलविषयक लेख पाठविले जातील, यात शंका नाही...या दिवाळी अंकाला माझ्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा !
 

फारच स्तुत्य उपक्रम आहे...
आतुरतेने वाट बघतोय या अंकाची.... :)
या अंकाच्या प्रकाशनाला मनापासुन शुभेच्छा...

गझल आणि गझलविषयक लेखांसाठी  निघणार्‍या ऑनलाइन दिवाळी अंकास हार्दिक शुभेच्छा !!!
 
अवांतर : बेरजेमुळे जीवावर येतं प्रतिसाद टाकायला ! :)

माझ्याही अगदी मनापासून शुभेच्छा.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०