सुरेश भट नावाचा मस्त कलंदर

पण ज्यांना भटांचा थोडाफार सहवास लाभला , त्यांना या वैदभीर्य ऐसपैस माणसाची प्रतिभा बसल्या बैठकीतच कशी खुलत जायची , याची कल्पना आहे. ' भर उन्हात आले , काही पावसात आले , मला शब्द भेटायला गात गात आले ', असे ते सहजगत्या लिहून जात व त्याचे ' काव्य ' बने. गेल्या शतकात महाराष्ट्राने गदिमांसारखा प्रतिभासंपन्न कवी पाहिला. भटांची जातकुळीसुद्धा तीच होती. ' हाय तरीही बाजारी , माझी तोकडी पुण्याई , नाही अजून तेव्हढी माझ्या शब्दांना कल्हई ', असे ते म्हणत असले , तरी त्यांच्या शब्दांना केवळ कल्हईच नव्हे , तर तलवारीची धारही होती.

'मग माझा जीव'ची आठवण

त्या काळात मी बांद्र्याला साहित्य सहवासमध्ये राहत होतो. दिनकर साक्रीकरांचा धाकटा आर्किटेक्ट मुलगा राजू खास दोस्त बनला होता. रात्री पायर्‍यांवर गप्पा मारत बसलो असताना मी सहज त्याला माझा कवितेचा चाललेला शोध सांगितला. काही क्षणात तो एकदम म्हणाला, "तू नेहमी दोनच ओळी गुणगुणत असतोस, त्या सुरेश भटांच्याच आहेत ना? मग माझा जीव... असे काहीतरी शब्द आहेत बघ." मी चमकून विचारलं, "मी आपला चाळा म्हणून ते गुणगुणत असतो. काव्यगायनासारखं. पण ती तुला चांगली चाल वाटते?" तो गोंधळून म्हणाला, "का? ती छानच चाल आहे की!" असा अगदी अकल्पितपणे माझा कवितेचा शोध संपला.

Taxonomy upgrade extras: 

अनंतची गझल

उर्दूतली तरलता, हिंदीच्या दुष्यंतकुमाराची सरलता आणि आपल्या गझलेला असलेला आपला स्वतःचा चेहरा हे अनंतच्या गझलेची वैशिष्ट्ये आहेत... ... ती संयतही आहे आणि हळूच भाष्य करणारीही. समाज, प्रेम, दुःख, उत्सव साऱ्यांनी ती युक्त आहे.

वृत्ताची निवड

कित्येकदा आपल्याला कल्पना सुचतात आणि आपण एखादे वृत्त निवडून शेर करतो. कधी कधी कल्पना वृत्तामधेच सुचतात. वृत्ताला त्या सोबतच घेऊन येतात.
एखादेच वृत्त सुचले असेल तर प्रश्न नाही. गझल त्या वृत्तात होऊन जाते. पण एका कल्पनेसाठी कधीकधी एकपेक्षा जास्त वृत्ते सुचतात आणि त्यापैकी कोणते वृत्त निवडावे हा पेच पडतो. अशावेळी कोणते वृत्त निवडावे ?

गझलचर्चा: 

मनातल्या मनात मी...

कविवर्य सुरेश भट यांच्या गीतांवर काही लिहावे, असे बऱयाच दिवसांपासून मनात घोळत होते. गाणं म्हटलं की, आपल्या डोळ्यांपुढे जी रचना (आकृतिबंधाच्या दृष्टीने) येते, तशा प्रकारची गाणी कविवर्य भट यांनी रचलेली नाहीत...या सदरात आकृतिबंधाची वैशिष्ट्ये सांगण्यापेक्षा आशयावरच भर दिला जाईल.दर पंधरवड्याला एक अशा प्रकारे या संकेतस्थळावर कविवर्य भट यांच्या गाण्यांवर लिहायचे आहे...त्याची ही सुरुवात. मनातल्या मनात मी...या नितांतसुंदर गीतापासून.

गझलकारांची सूची

गझलकारांनी किंवा इतर गझलकारांबद्दल प्रतिसादात माहिती द्यावी. दिलेल्या माहितीत दुरुस्ती सुचवायची असल्यास त्यासाठी उपप्रतिसाद द्यावा. तसेच प्रतिसादातील मजकूर खालील क्रमात द्यावा:

  1. नाव
  2. संक्षिप्त परिचय (शक्य झाल्यास)
  3. पत्ता
  4. दूरध्वनी क्रमांक
  5. ईमेल


प्रतिसादात दिलेली माहिती सावकाश सूचीबद्ध
करण्यात येईल. कृपया ह्या कार्यास हातभार लावावा, ही
विनंती.



Pages