२
आपुलिया बळें... .
" सोयीनुसार, परवडते म्हणून किंवा 'करीयर'साठी गझल लिहायची नसते... ...जे 'करीयर'साठी गझलेकडे वळले, त्यांची हालत ' न इधर के रहे, न उधरके रहे!' अशी झालेली आहे. केवळ गझलेच्या फॉर्ममध्ये लेखन केले, म्हणूनही ती गझल ठरत नसते.'फॉर्म' सांभाळून केलेल्या निर्जीव लेखनाला 'गझल' म्हणत नसतात. अशी तथाकथित गझल कोणताही परिणाम करीत नसते, आणि ज्याची थांबण्याची तयारी नाही, त्याने गझलेच्या वाटेला जाऊ नये!"
'झंझावात' या गझलसंग्रहाची प्रस्तावना पुढे वाचा...
आयुष्य तारण राहिले...
' सुरेश भट ' या दोन शब्दांत काय काय साठवलं होतं. ती भाववृत्ती , ती बेपर्वाई , ती तंद्री , ती मराठी गझलची खांद्यावर घेतलेली पताका , ते मराठी भाषेच्या अणूरेणूवरचं प्रेम , ती कवितेची तगमग , ती धुंदी , ते मैफली गाजवणं , ती बेहोषी , तो कैफ आणि एक बेछूटपणासुद्धा...
सुरेश भटांची गझल : एक संवाद
"मधाळ कोमल शब्दांत आदिम शारीर भाव आणि मनाचे कोमल बंध नाजूकपणे चित्रित करण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या काव्यात आढळते तसेच अनुदार समाजव्यवस्थेच्या विरुद्ध शब्दांचे शस्त्र परजण्याची शक्तीही आढळते. पण अट्टाहासाने स्वीकारलेल्या सामाजिक बांधीलकीतील तत्त्वज्ञानाचा उरबडवा प्रसार आणि प्रचार करण्याची आसक्ती मात्र त्यांनी अगदी सहजगत्या टाळली आहे. त्यांची कविता खऱ्या अर्थाने माणसांची कविता आहे.''
गझलेची बाराखडी
कविवर्य सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून 'गझलेची बाराखडी' नावाची एक पुस्तिका लिहिली होती... ...वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे.नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. नवे-जुने गझलकार असोत वा गझलेबद्दल जाणून घ्यायची इच्छा बाळगणारे वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे. लाभ घ्यावा.
'रिपब्लिकन' स्वामी विवेकानंद!
'रिपब्लिकन' स्वामी विवेकानंद!
आज मी स्वतः मागणी करीत आहे की, रामजन्मभूमीची मुक्ती झालीच पाहिजे आणि अयोध्येची बाबरी मशीद पाडून पाडून तेथे पूर्वी असलेले राममंदिर पुनः अधिक भव्य आणि दिमाखदार स्वरूपात उभे राहिले पाहिजे.
खूप बोलू लागला अंधार नंतर
Posted by चित्तरंजन भट on Monday, 21 December 2015खूप बोलू लागला अंधार नंतर
नीज आली पण पहाटे चार नंतर
वेल जाईची पुन्हा फुलणार माझी
सांज अवघी लालसर होणार नंतर
पैठणीच्या रेशमाचे काय झाले
घेतली कोणी विकत जरतार नंतर
खूप आधी मी तुझ्यावर प्रेम केले
हा तुझ्यामाझ्यातला व्यवहार नंतर
राग आला ह्याच गोष्टीचा अचानक
चीड आली खूप तपशिलवार नंतर
काय तू आहे असे केलेस पूर्वी ?
काय तू आहेस रे करणार नंतर ?
आंधळा होतास तू संपूर्ण आधी
आणि मग... झालास बहिरा ठार नंतर
खूप तो आहे तसा सहृदय कसाई
कळवळा येईल त्याला फार नंतर