जोडाक्षराच्या पुढील मागील शब्दाचे लघु गुरु कसे असतात ?
Posted by स्वप्ना on Sunday, 23 September 2007मात्रा कशा मोजाव्यात ?
बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली
कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी
मात्रा कशा मोजाव्यात ?
मी गझल शिकते आहे.त्यामुळे कॄपया ज्या चुका आढळतील त्या मान्यवर वाचकांनी सांगितल्या तर मला रचनेत सुधारणा करता येतील,धन्यवाद
समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते;
मीपण अवघे किंमत भारी प्रेम मागते.
झोप सुखाची, चैन जिवाची, खुशी मनाची;
अशी आपली दौलत सारी प्रेम मागते.
आनंदाचे देणे-घेणे करते नगदी;
आठवणींची किती उधारी प्रेम मागते!
कधी रातच्या विलायचीला नाही म्हणते;
कधी दुपारी पान सुपारी प्रेम मागते.
शेजेवरती सांगे ताबा घरी रुक्मिणी;
कोणी वेडी मीरा दारी प्रेम मागते.
(असंग्रहित/प्रसिद्धी: कविता-रती/दिवाळी अंक २००४)
तुला पाहिजे तसे वाग तू ;
भल्या बुऱ्याला लाव आग तू.
उगाच खोटी भीड कशाला ;
हक्क आपला तिला माग तू.
कुठे अचानक गायब झाले ;
त्या सत्याचा काढ माग तू.
जमेल जेथे मैत्र जिवाचे ;
तिथे फुलांची लाव बाग तू.
मनात नाही त्याच्या काही ;
नकोस त्याचा धरू राग तू.
अजून नाही रात्र संपली ;
सक्त पहारा देत जाग तू.
(प्रसिद्धी: 'कविता-रती' दिवाळी अंक २००६)
विचारीन पांढर्या छडीला...