वाच पुस्तके!
Posted by अविनाश ओगले on Sunday, 9 December 2007स्वत्व, संस्कृती, मायमराठी हवी जपाया
मातीचा अभिमान पाहिजे; वाच पुस्तके
शब्दास ही आज माझ्या ये लाज ती जराशी
तोकडे कपडे हा आजकालचा प्रोब्लेम झाला आहे. बाब अशी की प्रश्न ज्याचा त्याचा आहे; पण कधी कधी हे जरा अतीच होतं.. मग अशी गझल लिहावी वाट्ते....
उधार आहे....
माझ्याकडे जगाचे हसणे उधार आहे....
त्या कोवळ्या कळीचे फुलणे उधार आहे....
घाय
अखाडा
Posted by धोंडोपंत on Sunday, 9 December 2007जिंदगी झाली अखाडा
रोज खस्ता, रोज राडा
गारवा नाही मिळाला
सोसला नुसता उकाडा
दु:खितांचे गीत माझे
हा न धेंडांचा पवाडा
सूर्य क्रांतीचा उगवला
खोल रे आता कवाडा !
काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा
हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा
राहिलो एकेकटे दोघे जगत....!
Posted by प्रदीप कुलकर्णी on Friday, 7 December 2007.......................................................
राहिलो एकेकटे दोघे जगत....!
.......................................................
हुरहुरत तूही नि मीही तगमगत...!
राहिलो एकेकटे दोघे जगत...!
जागवत बसलो स्वतःला व्यर्थ मी
मीच माझे ऐकले नाही स्वगत...!
गंध उडतो; रंगही पडतो फिका...
शेवटी सार्या फुलांची हीच गत...!!
आणखी, माझ्या जवळ ये, आणखी...
तू जरी आहेस ह्रदयाच्या लगत...!
कोळसा समजून ज्याला फेकले
दूर तेथे राहिला तो झगझगत...!
रंजकी जब...
Posted by केदार पाटणकर on Thursday, 6 December 2007ओळख झाल्यावर समवयीन व्यक्तीसुध्दा एकदम एकेरीवर येत नाहीत. हळुहळू परिचय वाढल्यावर आपोआप 'आपण' 'तुम्ही' वरून कधी अरे तुरे सुरु होतं, कळतही नाही. मैत्रीचं नातं निर्माण होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं जातं. या शेरात तर दु:ख व्यक्त करण्याचा मामला आहे. एकमेकांच्या व्यथा ऐकण्याचे ते क्षण गहिरे होत जाऊन आदरार्थी बहुवचन कसं प्रेमळ एकवचनात रूपांतरीत होतं...याचं हा शेर अचूक शब्दांत वर्णन करतो.
बेसुरी सुरुवात...
Posted by जनार्दन केशव म्... on Wednesday, 5 December 2007बेसुरी सुरुवात झाली जीवनाची
फक्त आलापीच आहे.. वेदनांची
भैरवी आधीच... मैफल संपवावी
ही प्रथा नाहीच कुठल्या गायनाची
ताल हा... धरलाच आहे तू चुकीचा
सम तरी सांभाळ आता... वादनाची
सूर हे जुळतील आता सांग कुठुनी ?
तार ही तुटली तुझ्या-माझ्या मनाची
वेदनेचा... षडज-पंचम लागला हा
अन सुरावट छान जमली प्राक्तनाची
बासरी जमवायची ती... गोपगोपी
वाढली वर्दळ कशाने ? यातनांची