तू
Posted by जयश्री अंबासकर on Wednesday, 11 March 2009या संकेतस्थळावर पहिल्यांदाच गझल टाकण्याचं धाडस करतेय. गुरुजींनी सांभाळून घावं :)
तू
तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते
तसे सोबतीच्या करारात होते
नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा
तुझ्या मुक्त केसातही रात होते
पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला
तुझे दाद देणे अकस्मात होते
नसावे नशीबात घायाळ होणे
तुझे तीर सारे पहा-यात होते
निशेला न ऐसेच वैराग्य आले
तुझे चांदणे ऐन बहरात होते
जयश्री
गझल:
कवी चंद्रशेखर सानेकर ह्यांची दैनिक प्रहारमध्ये प्रकाशित झालेली गझलेवरील लेखमालिका
Posted by विश्वस्त on Wednesday, 11 March 2009कवी चंद्रशेखर सानेकर ह्यांची दैनिक प्रहारमध्ये प्रकाशित झालेली गझलेवरील
Taxonomy upgrade extras:
अस्वस्थ समुद्र काळजातला
Posted by विश्वस्त on Wednesday, 11 March 2009Taxonomy upgrade extras:
लोकांची संपदा
Posted by विश्वस्त on Wednesday, 11 March 2009लोकांची संपदा
Taxonomy upgrade extras:
डोळे नाही दृष्टी
Posted by विश्वस्त on Wednesday, 11 March 2009डोळे नाही दृष्टी
Taxonomy upgrade extras:
माझी सावलीही रंगली...
Posted by जयन्ता५२ on Wednesday, 11 March 2009कान्हा,पुरे,सारी पहा मी रंगली
माझी,अरे,बघ सावलीही रंगली!
मिळतात कोठे रंग हे गहिरे तुला?
आत्म्यासवे ज्यांनी तनू ही रंगली!
हे भाळ,ते आभाळ, झाले रे निळे
गोकुळ निळे,यमुना निळी ती रंगली!
गझल:
पुलस्ति ह्यांच्या गझला
Taxonomy upgrade extras: