कैक मतले...

कैक मतले ...फक्त पडलेले!
काफिये...का सर्व अडलेले?!

रोज गगनाची मला पृच्छा.,
"काय तव पंखात दडलेले..?!"

सूर्य संध्येला असा भासे..,
की क्षितीजी रत्न जडलेले!

बांध तोरण जर्द पानांचे..,
रे वसंता...बहर झडलेले!

घुंगरू आले नशीबी अन,
पाय मग हे खूप रडलेले!

का अजूनी शिखर गवसेना..?
पाय तर वेगात पडलेले..?!

सांग ना दरिया मलाही ते..,
शिंपल्याच्या आत घडलेले!

           -मानस६

गझल: 

ऑनलाईन गझल मुशायरा

मराठी गझल  सादर करत आहे जगातला बहुतेक पहिला ऑनलाईन मराठी गझल मुशायरा.हा मुशायरा पुढचे ६-८ आठवडे दर आठवड्याला एक ह्याप्रमाणे प्रकाशित केला जाणार आहे  आणि तो ऑनलाईन ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तेव्हा गझल चाहत्यांनी जरूर भेट देऊन गझलांचा आस्वाद घ्यावा.दर आठवड्याला आधीचा भाग जाऊन नविन भाग ऐकायला मिळेल तेव्हा दर आठवड्याला भेट द्यायची विसरू नका... :)

आगामी कार्यक्रम: 

Pages