लिहायचे ते लिहून टाकू
Posted by बेफिकीर on Thursday, 12 November 2009लिहायचे ते लिहून टाकू इथे कुणाची फिकीर आहे?
कुणी न येथे हुजूर माझा न मी कुणाचा वजीर आहे
हवी कशाला पुढील जन्मातली तुझी गोड गोड वचने
क्षणावरी शंभरी उधळण्या मुळात कोणास धीर आहे?
कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले !
ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
लिहायचे ते लिहून टाकू इथे कुणाची फिकीर आहे?
कुणी न येथे हुजूर माझा न मी कुणाचा वजीर आहे
हवी कशाला पुढील जन्मातली तुझी गोड गोड वचने
क्षणावरी शंभरी उधळण्या मुळात कोणास धीर आहे?
बरा वागतो जमेल तेंव्हा
खरे बोलतो जमेल तेंव्हा
हवे सर्व ते घरात आहे
तरी चोरतो जमेल तेंव्हा
असे चूक सर्वथा तरीही
तिला भेटतो जमेल तेंव्हा
मला माळ ओढणे जमेना
फुले वाहतो जमेल तेंव्हा
केवळ तुझी होऊन झंकारायचे
आहे ठरवले मी तुला भेटायचे
केवळ तुझी होऊन झंकारायचे
आधीच आहे वाट माझी हरवली
कोठून रस्ते वेगळे शोधायचे?
आयुष्य हाती यायचे नाही कधी
वा आदि देवा जगत्रया जीवा । परियेसी केशवा विनंती माझी ॥१॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम काही कळा ॥२॥
कळा तुजपाशी आमुचे जीवन । उचित करून देई आम्हा ॥३॥
मागचे जाती पुढे मग खालचे येती वरी
आपली कोणीच आता ओळखे ना पायरी
झुंज होते वादळाशी पण कुठे ना बातमी
बातमी आता पर्यांची येतसे घरच्याघरी
मी भरावे कैक खड्डे रोज प्रेमाने तरी
रस्त्यासाठी जमीन खोदणार्या मजुरापासून एक लाख कोटीचा व्यवसाय करून १२० कोटींच्या देशात सुप्रसिद्ध होणारे व्यावसायिक यांच्यापर्यंत - ही जी 'रेंज' आहे त्यामधील बहुतांशी ९८% माणसे ही मायावी जीवनाच्या चक्रात स्वतःला भौतिकदृष्ट्या यशस्वी करण्याकडे झुकलेली असतात... मनाने!
मध्यरात्री गाठते भलतेच बादल पाखरू
बिननियंत्रण फडफडे हे 'अॅबनॉर्मल' पाखरू
लावते कुंकू कुणाचे हे कुणी पाहू नये
पोचते भलत्याकडे घालून 'काजल' पाखरू
एक मंगळसूत्र जातो घालण्या त्याच्या गळ्या
नातू म्हणला परवाला जग मल्लीकाचे आहे
तेव्हा कळले आम्हाला जग मल्लीकाचे आहे
त्वा धोतर सोडुन आता (?) ही टृयाकप्यांट 'नेसावी'
पत्नी म्हणते नवर्याला 'जग मल्लीकाचे आहे'