हे भाषांतर बरे आहे का?
Posted by बेफिकीर on Tuesday, 8 December 2009माझ्या 'केवढे छान दिवस होते ते'या रचनेवर श्री. हेमंत पुणेकरांचे काही प्रतिसाद आल्यानंतर माझे व त्यांचे एक दोनदा दूरध्वनीवर संभाषण झाले. त्यात असे ठरले की त्यांनी त्यांची एक गुजराती गझल अर्थासहीत या संकेतस्थळावर लेखस्वरुपात प्रकाशीत करायची किंवा ती मला पाठवायची. त्याप्रमाणे तयंनी ती मला निरोपातून पाठवली. मी पहिल्यांदाच एक गुजराती गझल वाचली. मला त्यातील तीन ते चार शेर आवडले. हेमंतरावांनी मला त्याचे चक्क भाषांतर करायला सांगीतले. मी वृत्त तेच ठेवून अनुवादाचा प्रयत्न केलेला आहे.