४ गझला : चंद्रशेखर सानेकर

प्रतिसाद

माननीय विश्वस्त,
साईटवरील गझलांच्या क्रमामधे आलेल्या प्रतिसादांनुसार व नवीन प्रकाशित झालेल्या गझलांनुसार वारंवार बदल होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. खरे तर ही गोष्ट ऑनलाईन असते पण साईटच्या सन्मानासाठी सर्व प्रतिसाद व रचना संपादीत होतात हे मी जाणतो. पण जर दोन दोन दिवस त्याच्यात फारसा बदल होत नसेल तर ते कंटाळवाणे होते व उत्साह कमी व्हायला लागतो. आज दुपारी काहीतरी तांत्रिक अडचण होती हेही मला माहीत आहे परंतू गेले दीड दोन दिवस साईटच्या मुखपृष्ठामधे ( गझल, लेख, चर्चा, आजचा शेर इत्यादी ) बदल होत नव्हते. आपल्याला अशी विनंती आहे की हा मुद्दा कृपया विचारात घ्यावात.
श्री सानेकरांच्या ४ गझलांपैकी मला एकही गझल बघता येत नाहीये. ही पण काही तांत्रिक अडचण असल्यास मला ते माहीत नाही.
तसेच मला असे वाटते की त्यांच्या दोन्ही गझलसंग्रहांचे नांवही एकच दिसत आहे, जे तसे असेल असे मला वाटत नाही.
अर्थात या सर्व माझ्या भावना आहेत. नक्कीच या सर्वामागे काहीतरी समर्थनीय कारण असणार हे मी जाणतो.
धन्यवाद!

सुंदर गझला आहेत. मनःपूर्वक आभार.
कलोअ चूभूद्याघ्या