जगात काही कुरूप नाही, जगात काही सुंदर नाही
जगात काही कुरूप नाही, जगात काही सुंदर नाही
आरसपानी नजर हवी मग कुठले अंतर अंतर नाही
तुमच्या सोन्याच्या घासाला माझ्या कोंड्याची सर नाही
माझ्या उपासमारीइतकी तुमची तृप्ती सुंदर नाही
दोन घडीचे तुझे भेटणे, त्यातच जीवन, त्यातच मृत्यू
फार चांगले झाले जगात काहीही अजरामर नाही
दुनिया सांगत सुटली, ` बघ माझी ही नवीन जत्रा`
आणि हे ती त्याला सांगे ज्याचा कुठेच वावर नाही
हा दृष्टीचा चकवा नाही, ही तर माझी आत्मप्रचीती
मी माझ्याहुन कुरूप आहे आणि तुझ्याहुन सुंदर नाही
सगळ्यांना जाणवली आहे काळाची भन्नाट मुसंडी
एवढेच दिसते की सध्या ही दुनिया भानावर नाही
माझा झगडा सत्याशी, तुमचे अफवांशी लागेबांधे
माझी कुठली दिंडी नाही, तुमचा कुठला ईश्वर नाही
-- चंद्रशेखर सानेकर
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 03/11/2008 - 04:37
Permalink
फार सुंदर.
सगळ्यांना जाणवली आहे काळाची भन्नाट मुसंडी
एवढेच दिसते की सध्या ही दुनिया भानावर नाही
फारच सुंदर शेर आहे.
अजय अनंत जोशी
शुक्र, 07/11/2008 - 09:13
Permalink
झकास..
दोन घडीचे तुझे भेटणे, त्यातच जीवन, त्यातच मृत्यू
फार चांगले झाले जगात काहीही अजरामर नाही
कलोअ चूभूद्याघ्या
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 20/11/2008 - 22:32
Permalink
अ प्र ति म
जगात काही कुरूप नाही, जगात काही सुंदर नाही
आरसपानी नजर हवी मग कुठले अंतर अंतर नाही
अत्युत्तम...
तुमच्या सोन्याच्या घासाला माझ्या कोंड्याची सर नाही
माझ्या उपासमारीइतकी तुमची तृप्ती सुंदर नाही
सुंदर...
दोन घडीचे तुझे भेटणे, त्यातच जीवन, त्यातच मृत्यू
फार चांगले झाले जगात काहीही अजरामर नाही
अजरामर शेर !
सगळ्यांना जाणवली आहे काळाची भन्नाट मुसंडी
एवढेच दिसते की सध्या ही दुनिया भानावर नाही
अ प्र ति म