भटसाहेबांच्या सहवासात...

''हे बघा, कुर्कल्णी...प्रदीप ना तुमचं नाव? आता मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. नाव व्हावं म्हणून कधीही लिहू नये. लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहावं. ('कधीही' हा शब्द उच्चारताना उजव्या हाताची तर्जनी त्यांनी मूठ स्थिर ठेवत अशा काही आग्रही पद्धतीनं हलवली, की तो मुद्दा माझ्या मनात त्या मुठीसारखाच स्थिर झाला. पुन्हा "राहवत नाही' हे शब्द ठाशीवपणे उच्चारल्यानंतर 'म्हणून' शब्द उच्चारताना तीच तर्जनी त्यांनी जमिनीच्या दिशेनं अशा वेगानं नेली, की तोही मुद्दा माझ्या मनावर खोलवर परिणाम करून गेला). नाव व्हावं म्हणून लिहिणारेही असतात; पण ते चमकतात, चमकतात आणि विझून जातात. गझल मनापासून आवडली, तरच तिच्या वाटेला जा. गझल मनापासून आवडत नसेल आणि नावासाठी तिच्याकडं वळला असाल, तर ही वाट सोडून आत्ताच वेगळी वाट धरा. आणखी एक सूत्र लक्षात ठेवा. साधना-सिद्धी-प्रसिद्धी. आधी साधना...मग साहजिकच सिद्धी...आणि सिद्धीनंतर आपोआपच प्रसिद्धी. प्रसिद्धीसाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही.''

चांदणी, चंचला, कामिनी, सुंदरा, मोहिनी, अप्सरा, कोण आहेस तू

चांदणी, चंचला, कामिनी, सुंदरा, मोहिनी, अप्सरा, कोण आहेस तू
बोलणे शृंखला, पाहणे पिंजरा, हासणे भोवरा, कोण आहेस तू

का तुला पाहिले की मला वाटतो एवढा आसरा, कोण आहेस तू
का तुझ्यावाचुनी जीव होतो असा घाबरा घाबरा , कोण आहेस तू

का तुझे नाव ओठांवरी सजवुनी, येत असते कुणी जात असते कुणी
का दिवसरात फिरतात हल्ली तुझा लावुनी चेहरा, कोण आहेस तू

हिरवळू लागले काठ माझ्या मनाचे, उन्हाची फुले व्हायला लागली
स्पर्श करताच तू वाहता जाहला, आटलेला झरा, कोण आहेस तू

गझल: 

वाहते का ? हवाच आहे की !

वाहते का ? हवाच आहे की !
उंच उडतो ? फुगाच आहे की !

मी तुझ्यासारखाच आहे की
मी तुझा आरसाच आहे की

काय सांगू तरी तुला आता ?
सर्व काही पताच आहे की !

बनचुका तू नि बनचुका मीही
काळही बनचुकाच आहे की !

श्वास घेऊन पाहतो आहे;
भास माझा खराच आहे की...

वेगळा वेगवेगळ्या वेळी -
हा तुझा चेहराच आहे की...

नाव माझे तुझ्या सुगंधावर
एकदा नीट वाच, आहे की!

एक ही सोडली मिठी तर मग
सर्व बाकी वृथाच आहे की

ही तुझी रात्र उर्वशी आहे
दिवसही पुरुरवाच आहे की

गझल: 

घर

--------------------------------------

घराला राहिले आता कुठे घर
स्वत:चे गाव सोडुन चालले घर

असे कित्येक जागी वाटते की
इथे नक्कीच नाही आपले घर

कसे माझ्याघरी पोचायचे मी
असे रस्त्यात जर आले तुझे घर

मिळाला फक्त दर्जा 'बायको'चा
तिला सोडून यावे लागले घर

विकत घेऊन आलो एक जागा
विकावे लागले आहे जुने घर

मलाही धीर झाला एकदाचा
तुलाही पाहिजे होते नवे घर

-ज्ञानेश.

-------------------------------------

गझल: 

आपले रडणे....एक रसग्रहण

मित्रहो, वैभव देशमुख यांची आपले रडणे सृजन आहे जणू ही गझल सकाळ वृत्तपत्राच्या १८ मे २०१४ च्या सप्तरंग पुरवणीत प्रसिध्द झाली. तिचे हे अल्पमतीनुसार केलेले रसग्रहण.

मी काही स्वप्नांच्या नुसता सोबत बसतो

सुखान्त गोष्टी रोज नव्या मी जुळवत बसतो
एक उदासी रोज रोज ओलांडत बसतो

`असेच होइल' घालताच समजूत मनाची
मी सुध्दा मग `तसेच होइल' समजत बसतो

देणे असते अखेर या डोळ्यांचे काही
मी काही स्वप्नांच्या नुसता सोबत बसतो

कुठेतरी असणार रात्र.. तुटणारा तारा
दिवसासुध्दा मनात काही बोलत बसतो

चित्रामधले घर एखादे अबोल असते
खुळ्यासारखा तेच दार ठोठावत बसतो

कुणीतरी येताच जाग डोकावत असते
रात्र रात्र सगळा कोलाहल खोडत बसतो

गझल: 

शेरो-शायरी : प्रस्तावना

नमस्कार काव्य-प्रेमी मित्रांनो,
आज दि.१५ अप्रिल रोजी कै. सुरेश भट ह्यांच्या जन्म-दिनाचे औचित्य साधून शे(अ)रो-शायरी ही नवीन लेखमाला सुरु करताना मी आनंदलो आहे.

नात शरीफ

सप्टेंबर १९८७ मध्ये पुण्यात उर्दूचे मोठे अभ्यासक व शैलीदार स्तंभलेखक-पत्रकार, शिक्षक, समीक्षक जोए अन्सारी आले होते. अन्सारींच्या पुणेभेटीचे निमित्त साधून कवयित्री संगीता जोशी ह्यांच्या घरी एक अनौपचारिक बैठक झाली होती.ह्या मैफलीत कविवर्य सुरेश भट ह्यांनी त्यांच्या प्रसिद्ध नात शरीफचे काही शेर सादर केले होते. त्याचे हे ध्वनिमुद्रण.

Pages