लाथाडती सारे मला

खोटे असो किंवा खरे ज्याचेच जो तो भोगतो
जागाच आहे देव तो पापे तुझी तो मोजतो

लाथाडणारे पाय ते झेलू कसे छातीवरी
आसूड तो पाठीवरी का मारता हो रोज तो

गझल: 

सोयरा

श्रावणाने आटलेला तो झरा माझाच होता
वादळांनी बांधलेला आसरा माझाच होता

कैक त्या पात्रात गेले, अन् सुखे परतून आले,
मी बुडाले एकटी, तो भोवरा माझाच होता

तो जरी चुकवून गेला ताल माझ्या बंदिशीचा,

गझल: 

लगान एकदा तरी..... (हझल?)

लगान एकदा तरी..... (हझल?)

चरेन शासकीय कुरण-रान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री
बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी

गझल: 

हो गझल गैरमुसलसल आता..

हो गझल गैरमुसलसल आता
कोरडे वागणे बदल आता

चेहरा वेगळीकडे केला
घेतली आपली दखल आता

एक उडता कटाक्ष झिलमिलला
ओळ रचणार मी तरल आता

मी तुझा वा कधी स्वतःचा मी
सारखे हेच दलबदल आता

गझल: 

एकदा तरी

मायबोलीवर डॉ. कैलास ह्यांनी दिलेल्या मिसर्‍यावर लिहीलेली ही तरही गझल

लढेन षड्रिपुंसवे किमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

पहाड, जंगले, नद्या उदास सर्व भासती

कधी कधी

कधी कधी एखादी घटना समजत नाही
नाही कळली तरी फारसे बिघडत नाही

लाख वाटते, काही गोष्टी विसराव्या पण..
असा आजवर अनुभव की मी विसरत नाही

समोर जे जे येते, जातो सामोरा मी

गझल: 

जखमेस ओल आली....

जखमेस ओल आली....

एकांत रूक्ष माझा, फेटाळतो जरा मी...
गर्दीत माणसांच्या, रेंगाळतो जरा मी...

मज जिंकण्या मिळावा, का वाव ना कधीही??
नुसत्या 'पराभवाला', कंटाळतो जरा मी...

गझल: 

आरंभ...

आरंभ...

हे सूर छेडताना, भलताच त्रास झाला...
माझ्या गळ्यास माझा, आवाज फास झाला...

स्मरूनी तुला सख्या रे, मल्हार छेडला मी...
संचीत आठवांचा पाऊस खास झाला...

गझल: 

Pages