गझल

गझल

हमी

कुणालाच माझी हमी आज नाही.
जगाला कशी बातमी आज नाही ?

मला एकट्याला नको दोष देऊ.
तुझी प्रीतही संयमी आज नाही..!

कधी मी म्हणालो हवे चंद्र तारे,
कसा काजवाही तमी आज नाही..!

जरा धाव घे आसवांच्या सवे तू.
खरे दुःख हे, मोसमी आज नाही..!

तुझ्या वेदनेची नशा और काही.
तशी वेदनांची कमी आज नाही..!

-- अभिजीत दाते

गझल: 

Pages