आपुलिया बळें... .
"पण आज मराठी गझल म्हणजे मराठी काव्यातील एक शक्तिशाली वस्तुस्थिती आहे, हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसांनी- विशेषतः,तरूण पिढीने मराठी गझलेचा संपूर्ण स्वीकार केलेला आहे. येथे' स्वीकार' हा शब्द
फार महत्त्वाचा. सोयीनुसार, परवडते म्हणून किंवा 'करीयर'साठी गझल लिहायची
नसते. गझलच कशाला, कोणताही काव्यप्रकार हाताळायचा नसतो! जे 'करीयर'साठी
गझलेकडे वळले, त्यांची हालत ' न इधर के रहे, न उधरके रहे!' अशी झालेली आहे. केवळ गझलेच्या फॉर्ममध्ये लेखन केले, म्हणूनही ती गझल ठरत नसते.'फॉर्म' सांभाळून केलेल्या निर्जीव लेखनाला 'गझल' म्हणत नसतात.अशी तथाकथित गझल कोणताही परिणाम करीत नसते, आणि ज्याची थांबण्याची तयारी नाही, त्याने गझलेच्या वाटेला जाऊ नये!"
'झंझावात' या गझलसंग्रहाची प्रस्तावना ८ भागात सादर आहे.