भटांच्या लेखणीतून

भटांच्या लेखणीतून

माझ्या कवितेचा प्रवास

"एखाद्या प्रेषिताचा आव न आणता मी अगदी प्रेमपूर्वक नव्या कवींना सांगू इच्छितो की, प्रसिद्धी म्हणजे महानता नव्हे; सामान्य जनता ज्या कवीचा संपूर्ण स्वीकार करते, ज्याच्या काव्यपंक्ती जनजीवनाचा अविभाज्य भाग बनतात. तो कवी आपोआप, अगदी सहज महान बनतो. "
  पुढे वाचा...

एल्गार- कैफियत

"मी माझा कौल तरुण पिढीच्या बाजूने दिलेला आहे आणि म्हणून गझलेचे जे निर्भेळ सत्य आहे, ते आणि फक्त तेच कोणाचीही पर्वा न करता येथे सांगणे हे माझे कर्तव्य आहे... ... उगवत्या पिढीने गझलेला आपले म्हटले की, मला हे सार्थक मिळणार आहे."

आपुलिया बळें... .

" सोयीनुसार, परवडते म्हणून किंवा 'करीयर'साठी गझल लिहायची नसते... ...जे 'करीयर'साठी गझलेकडे वळले, त्यांची हालत ' न इधर के रहे, न उधरके रहे!' अशी झालेली आहे. केवळ गझलेच्या फॉर्ममध्ये लेखन केले, म्हणूनही ती गझल ठरत नसते.'फॉर्म' सांभाळून केलेल्या निर्जीव लेखनाला 'गझल' म्हणत नसतात. अशी तथाकथित गझल कोणताही परिणाम करीत नसते, आणि ज्याची थांबण्याची तयारी नाही, त्याने गझलेच्या वाटेला जाऊ नये!"
'झंझावात' या गझलसंग्रहाची प्रस्तावना   पुढे वाचा...

गझलेची बाराखडी

कविवर्य सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून 'गझलेची बाराखडी' नावाची एक पुस्तिका लिहिली होती... ...वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे.नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. नवे-जुने गझलकार असोत वा गझलेबद्दल जाणून घ्यायची इच्छा बाळगणारे वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे.  लाभ घ्यावा.

शेवटी महत्वाचे

महत्वाचे-

१. झल लिहिण्यासाठी निर्दोष वृत्तात लिहिता येणे आवश्यक आहे. शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा.


२. प्रत्येक शेर म्हणजे एक संपूर्ण कविताच असते. गझल उलगडत नसते. कोणताही शेर सुटा वाचला तरी तो संपूर्ण अभिव्यक्ती असलेली कविता वाटणे, हे गझलेचे गमक आहे. नुसत्या आकृतिबंधाने गझल ठरत नसते.