जटायू


का पुन्हा खोटे हसावे वाटते?
चेहर्‍यामागे लपावे वाटते...

कोणते ओझे उरी मी वाहतो
मोकळे व्हावे, रडावे वाटते!

चार दाणे आज कोणी टाकले
पाखरांना किलबिलावे वाटते

नेहमी नाकापुढे तो चालतो
नेहमी त्याला वळावे वाटते!

प्रश्न माझा वाल्मिकीला एवढा -
का जटायूला लढावे वाटते?

काय त्याचा दोष? कसली ही सजा?
...काय त्यालाही जगावे वाटते?

तोच मी अन त्याच या संवेदना
का नवी कविता लिहावे वाटते?

हे असावे ते नसावे वाटते
यात का आयुष्य जावे वाटते?

जाणतो होणार नाही जे कधी
ते अचानक आज व्हावे वाटते...


गझल: 

प्रतिसाद

कोणते ओझे उरी मी वाहतो?
मोकळे व्हावे, रडावे वाटते!
वाव्वा
चार दाणे आज कोणी टाकले?
पाखरांना किलबिलावे वाटते
वाव्वावा...
वरील दोन शेर अतिशय आवडले.  मस्त!! (तसे सगळेच शेर अगदी  समृद्ध आहेत.) अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

.... म्हणायचे आहे. मस्त!!!

पुलस्ति,

कोणते ओझे उरी मी वाहतो
मोकळे व्हावे, रडावे वाटते!
नेहमी नाकापुढे तो चालतो
नेहमी त्याला वळावे वाटते!
तोच मी अन त्याच या संवेदना
का नवी कविता लिहावे वाटते?

....आवडले.
छान गझल.

पहिले चार शेर छान आहेत. इतर शेरांवर माझा शेरा:  शेरासाठी शेर (शेर बराए शेर) टाळा किंवा जे सांगायचे आहे ते भक्कमपणे सांगा. 

कोणते ओझे उरी मी वाहतो
मोकळे व्हावे, रडावे वाटते!
 
 
सुंदर शेर...

 

ही पूर्ण गझल खूपच सुंदर आहे. 'कोणते ओझे उरी मी वाहतो' आणि 'नेहमी नाकापुढे तो चालतो' हे दोन्ही शेर घुसमट छान दाखवतात.

कोणते ओझे उरी मी वाहतो
मोकळे व्हावे, रडावे वाटते!

प्रत्येकाचीच खंत. . .

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

गझल आवडलीच त्यातही हे शेर फार आवडले.
 
कोणते ओझे उरी मी वाहतो
मोकळे व्हावे, रडावे वाटते!
तोच मी अन त्याच या संवेदना
का नवी कविता लिहावे वाटते?
हे असावे ते नसावे वाटते
यात का आयुष्य जावे वाटते?
 

गझल आवडली.