साळसूद

पूल बांधतो जरी
वाढतेच का दरी?

भूक ही शिळीच अन
ही शिळीच भाकरी!

राग फार साचला,
काढला तुझ्यावरी

देतसे कधी हरी
काय खाटल्यावरी?

आलबेल या इथे
कत्तली तिथे जरी!

साळसूद ठेव तू
भाव चेहर्‍यावरी!

प्रश्न हेच जर तुझे -
व्यर्थ जिंदगी खरी!

गझल: 

प्रतिसाद

भूक ही शिळीच अन
ही शिळीच भाकरी!
वा, क्या बात है पुलस्ति. फारच मस्त शेर..मतलाही छान आहे.  तिसरा शेरही छान. गझल आवडली.






 

भूक ही शिळीच अन
ही शिळीच भाकरी! (वा...वा...!)

राग फार साचला,
काढला तुझ्यावरी  (फारच छान...!)

हे शेर विशेष आवडले...साधी, सोपी, सहज शैली.




वा पुलस्ति,
सुंदर गझल... छोटी बहर आणि अवघड वृत्त... तुम्ही सुंदरपणे निभावलंय.
पूल बांधतो जरी
वाढतेच का दरी? .. सुंदर.
शिळी भाकरी, आलबेल (हा शेर अमेरिका / इराक, ब्रिटनमधले हल्ले इ. अनेक पार्श्वभूमींवर आवडला) - सुंदरच.
- कुमार