वृत्ताची निवड
Posted by केदार पाटणकर on Monday, 26 May 2008कित्येकदा आपल्याला कल्पना सुचतात आणि आपण एखादे वृत्त निवडून शेर करतो. कधी कधी कल्पना वृत्तामधेच सुचतात. वृत्ताला त्या सोबतच घेऊन येतात.
एखादेच वृत्त सुचले असेल तर प्रश्न नाही. गझल त्या वृत्तात होऊन जाते. पण एका कल्पनेसाठी कधीकधी एकपेक्षा जास्त वृत्ते सुचतात आणि त्यापैकी कोणते वृत्त निवडावे हा पेच पडतो. अशावेळी कोणते वृत्त निवडावे ?