बोलणी
आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती
गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही
सुरेश भटांची गझल
आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!
हा शेर आपण आशाताईंच्या आवाजात अनेकदा ऐकला आहे. अगदी सोपा दिसणारा शेर खुप प्रगल्भ आहे. तारकांना आवाज नसतो मग उरात चांदण्याचे आवाज कशे उरले? आकाश जणु एक चादर होते आणी त्यात धातुचे चकचकित तारे होते. रात्र जातांना चादरी सारखे ते आकाश उचलून गेली आणी ते उचलून जातांना तार्यांचा जो आवाज झाला तो उरात उरला आहे. आहाहाहा..... भट साहेब, आम्ही केवळ नतमस्तक होउ शकतो!
होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले..
मारव्याच्या सुरावटीकरताच केवळ हे शब्द जन्माला आले.. आणि म्हणूनच भटसाहेबांनी हे शब्द मारव्यात गुंफले.. हे विलक्षण अद्वैत आहे.. शब्दांचं आणि मारव्याच्या सुरांचं!
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते.
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते.
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
नुसतीच तुझ्या मरणान्ची एकान्ती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते.
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते.
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते.
-: एल्गार :-