सुरेश भटांचे सूक्ष्म शेर

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!

हा शेर आपण आशाताईंच्या आवाजात अनेकदा ऐकला आहे. अगदी सोपा दिसणारा शेर खुप प्रगल्भ आहे. तारकांना आवाज नसतो मग उरात चांदण्याचे आवाज कशे उरले? आकाश जणु एक चादर होते आणी त्यात धातुचे चकचकित तारे होते. रात्र जातांना चादरी सारखे ते आकाश उचलून गेली आणी ते उचलून जातांना तार्यांचा जो आवाज झाला तो उरात उरला आहे. आहाहाहा..... भट साहेब, आम्ही केवळ नतमस्तक होउ शकतो!

गुजराती गझलेच्या परंपरेशी चांगली ओळख असल्याने मी त्या परंपरेच्या उजेडात मराठी गझलेला पहातो. गुजराती गझल साठी १९१० ते १९५० पर्यंत परंपरे चा काळ होता पण दुसर्या विश्वयुद्धा नंतर आधुनिक गझलेचा उदय झाला. त्या काळात परंपरे पेक्षा वेगळे विचार, वेगळ्या कल्पनांना वाव मीळाला आणी गुजराती गझलेने एक नवीन टप्पा गाठला.

सुरेश भट म्हणजे मराठी गझलेच आद्यदैवत! त्यांच्या गझला वाचतानां असे जाणवते की त्यात काही अशे विचार, कल्पना आहेत ज्यांना गुजरातीत आधुनिक गझलेचे लक्षण मानलेले आहेत. एक शेर आपण वर पाहिला. हे शेर खुपच सूक्ष्म, नाजुक, नवीन द्रुश्यात्मक कल्पना घेउन येणारे आणी ठसठशीत आहेत. ह्या शेरांकडे जेवढे लक्ष द्यायला हवे, त्यांची जेवढी चर्चा व्हायला हवी तेवढी झालेली नाही.

मला आवडलेल्या अश्या काही निवडक शेरांची सूची तयार केली आहे, आशा आहे तुम्हाला आवडतील. प्रत्येक रसरशित शेर नुसता वाचायचा नाही तर चघळायचा.

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्‍या हवेत होते!

कोण जाणे कोण हे जवळून गेले?
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!

या दुपारी मी कुणाला हाक मारु?
ओळखीचे चेहरे वितळून गेले!

कधीच हाक तुझी हाय ऐकली नाही
अखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो!

फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते

जरा तुझ्या अंगणात आलो उनाड वाऱ्यासवे उडालो
अता फुलांना विचार, 'येथे खरेच का एक पान होते?'

म्हणू नका आसवात माझे बुडून केव्हाच स्वप्न गेले
उदास पाण्यात सोडलेले प्रसन्न ते दीपदान होते

- हेमंत पुणेकर

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: