पाहुनी तुला

पाहुनी तुला खुलेल ही कळी
चेह-यावरी पडेलही खळी

आज ये निवांत भेटण्यास तू
आज मी घरी बरीच मोकळी

ये नि फक्त स्पर्श कर जरा मला
बघ, फुलेल एक एक पाकळी

जर तुझे तळे मला न लाभले
तडफडेल ही तुझीच मासळी

ठेव गात्र संयमी तुझे सख्या
मी तशी अजून खूप कोवळी...

गझल: 

प्रतिसाद

आकर्षणातील उत्कटता सुंदर.
तारुण्यातील भावनांचे अप्रतिम वर्णन.

ठेव गात्र संयमी तुझे सख्या
मी तशी अजून खूप कोवळी...
जरा जास्त स्पष्ट होतेय असे नाही वाटत.
लोभ असावा.

पाहुनी तुला खुलेल ही कळी
चेह-यावरी पडेलही खळी
सुंदर.

खुप छान. पाकळी आवडली.

सहज म्हणता येणारी, नाजुक... मात्र श्रुंगारीक गीताकडे झुकणारा आशय असलेली गझल वाटली.

चु.भु.द्या.घ्या.

अनिल, गंगाधर, प्रताप आणि ...बेफिकीर,
प्रतिसादांबद्दल आभारी.

सहज... तरीही उत्कट सुंदर...
वा..

छान. मोकळी गझल. मासळी छान. कोवळी बोल्ड.
माझाही एक शेर घ्या...
मी तशी हुशार वागण्यातुनी
चेहर्‍यावरून फक्त बावळी..

छान गीतसदृश आहे रचना.

आनंदयात्री, जोशी, भट..
आभारी आहे.

छान सहज गझल!
'मासळी' मात्र जरा कृत्रिम वाटलं.

छानये नि फक्त स्पर्श कर जरा मला
बघ, फुलेल एक एक पाकळी

हा शेर आवडला. यात स्पर्श न करता फक्त ये आणि तुझ्या नजरेनेच असे केले असते , अर्थात वृत्त सांभाळून तर जास्त परिणामकारक ठरला असता का हा शेर? ही फार फिल्मी झाला असता?
सोनाली

आनंदयात्री, जोशी, भट, फाटक व पुन्हा जोशी यांचे आभार.

सोनाली,
तुझ्या सूचनेप्रमाणे शेर केला असता तर कसा झाला असता, हे आता सांगणे मुश्किल आहे. बराच वेळ विचार करावा लागेल.ः))

ठेव गात्र संयमी तुझे सख्या
मी तशी अजून खूप कोवळी...

छान.

धन्यवाद.

छान गझल !

ठेव गात्र संयमी तुझे सख्या
मी तशी अजून खूप कोवळी...

चांगला शेर.....

धन्यवाद, प्रशांत.

धन्यवाद, वामन.

मस्त आहे...

छान...