पाहुनी तुला
पाहुनी तुला खुलेल ही कळी
चेह-यावरी पडेलही खळी
आज ये निवांत भेटण्यास तू
आज मी घरी बरीच मोकळी
ये नि फक्त स्पर्श कर जरा मला
बघ, फुलेल एक एक पाकळी
जर तुझे तळे मला न लाभले
तडफडेल ही तुझीच मासळी
ठेव गात्र संयमी तुझे सख्या
मी तशी अजून खूप कोवळी...
गझल:
प्रतिसाद
अनिल रत्नाकर
शनि, 20/02/2010 - 22:10
Permalink
आकर्षणातील उत्कटता
आकर्षणातील उत्कटता सुंदर.
तारुण्यातील भावनांचे अप्रतिम वर्णन.
ठेव गात्र संयमी तुझे सख्या
मी तशी अजून खूप कोवळी...
जरा जास्त स्पष्ट होतेय असे नाही वाटत.
लोभ असावा.
गंगाधर मुटे
रवि, 21/02/2010 - 05:19
Permalink
पाहुनी तुला खुलेल ही
पाहुनी तुला खुलेल ही कळी
चेह-यावरी पडेलही खळी
सुंदर.
प्रताप
सोम, 22/02/2010 - 07:42
Permalink
खुप छान. पाकळी आवडली.
खुप छान. पाकळी आवडली.
बेफिकीर
सोम, 22/02/2010 - 09:40
Permalink
सहज म्हणता येणारी, नाजुक...
सहज म्हणता येणारी, नाजुक... मात्र श्रुंगारीक गीताकडे झुकणारा आशय असलेली गझल वाटली.
चु.भु.द्या.घ्या.
केदार पाटणकर
सोम, 22/02/2010 - 15:48
Permalink
अनिल, गंगाधर, प्रताप आणि
अनिल, गंगाधर, प्रताप आणि ...बेफिकीर,
प्रतिसादांबद्दल आभारी.
आनंदयात्री
सोम, 22/02/2010 - 22:19
Permalink
सहज... तरीही उत्कट
सहज... तरीही उत्कट सुंदर...
वा..
अजय अनंत जोशी
सोम, 22/02/2010 - 22:31
Permalink
छान. मोकळी गझल. मासळी छान.
छान. मोकळी गझल. मासळी छान. कोवळी बोल्ड.
माझाही एक शेर घ्या...
मी तशी हुशार वागण्यातुनी
चेहर्यावरून फक्त बावळी..
चित्तरंजन भट
मंगळ, 23/02/2010 - 15:04
Permalink
छान गीतसदृश आहे रचना.
छान गीतसदृश आहे रचना.
केदार पाटणकर
गुरु, 25/02/2010 - 13:56
Permalink
आनंदयात्री, जोशी, भट.. आभारी
आनंदयात्री, जोशी, भट..
आभारी आहे.
ऋत्विक फाटक
शुक्र, 26/02/2010 - 20:31
Permalink
छान सहज गझल! 'मासळी' मात्र
छान सहज गझल!
'मासळी' मात्र जरा कृत्रिम वाटलं.
सोनाली जोशी
शुक्र, 26/02/2010 - 20:38
Permalink
छानये नि फक्त स्पर्श कर जरा
छानये नि फक्त स्पर्श कर जरा मला
बघ, फुलेल एक एक पाकळी
हा शेर आवडला. यात स्पर्श न करता फक्त ये आणि तुझ्या नजरेनेच असे केले असते , अर्थात वृत्त सांभाळून तर जास्त परिणामकारक ठरला असता का हा शेर? ही फार फिल्मी झाला असता?
सोनाली
केदार पाटणकर
मंगळ, 02/03/2010 - 11:14
Permalink
आनंदयात्री, जोशी, भट, फाटक व
आनंदयात्री, जोशी, भट, फाटक व पुन्हा जोशी यांचे आभार.
सोनाली,
तुझ्या सूचनेप्रमाणे शेर केला असता तर कसा झाला असता, हे आता सांगणे मुश्किल आहे. बराच वेळ विचार करावा लागेल.ः))
ह बा
सोम, 14/06/2010 - 13:02
Permalink
ठेव गात्र संयमी तुझे सख्या मी
ठेव गात्र संयमी तुझे सख्या
मी तशी अजून खूप कोवळी...
छान.
केदार पाटणकर
मंगळ, 15/06/2010 - 14:37
Permalink
धन्यवाद.
धन्यवाद.
प्रशान्त वेळापुरे
मंगळ, 15/06/2010 - 15:46
Permalink
छान गझल ! ठेव गात्र संयमी
छान गझल !
ठेव गात्र संयमी तुझे सख्या
मी तशी अजून खूप कोवळी...
चांगला शेर.....
केदार पाटणकर
गुरु, 17/06/2010 - 11:08
Permalink
धन्यवाद, प्रशांत.
धन्यवाद, प्रशांत.
केदार पाटणकर
मंगळ, 22/06/2010 - 13:33
Permalink
धन्यवाद, वामन.
धन्यवाद, वामन.
वैभव देशमुख
सोम, 28/06/2010 - 10:51
Permalink
मस्त आहे...
मस्त आहे...
मनोज ठाकूर
गुरु, 08/07/2010 - 16:27
Permalink
छान...
छान...