सडे मुरवुनी
सडे मुरवुनी आसवांचे, जमीनीतुनी वांझ बीजे खुडू लागले
निघाले जसे गाव शहराकडे, शेत ओसाड सारे रडू लागले
सुखातून दुःखे अशी भेटली की गतीरोधकाहून खड्डे बरे
मिळाली जरी एक आरामगाडी, प्रवासामधे भडभडू लागले
असे पाहिजे नी तसे पाहिजे यात आयुष्य हातातुनी चालले
घडू लागले ते बरे मानल्यावर जसे पाहिजे ते घडू लागले
रिकामाच होतो, सहज काढला आवरायास माळा मनाचा जरा
क्षणार्धात कुलुपे पुन्हा लावली मी, नको ते तिथे सापडू लागले
युगे जाहली पण तुझी पावले आज दारात माझ्या थबकली पहा
कुठे सोडला धीर या चेहऱ्याने, हृदय फक्त हे धडधडू लागले
तसे प्रेम एकाचवेळी उमलले, सरकले पुढे आपले आपले
मला लागली आवडायास ती अन तिलाही कुणी आवडू लागले
असावे इथे औषधाच्याचपुरते असा काढला आज निष्कर्ष मी
सदा या जगाला कडू लागलो मी, सदा जग मला हे कडू लागले
गझल:
प्रतिसाद
कैलास
गुरु, 25/02/2010 - 13:35
Permalink
रिकामाच होतो, सहज काढला
रिकामाच होतो, सहज काढला आवरायास माळा मनाचा जरा
क्षणार्धात कुलुपे पुन्हा लावली मी, नको ते तिथे सापडू लागले
क्या बात है!!!!
डॉ.कैलास
प्रताप
गुरु, 25/02/2010 - 16:26
Permalink
खुप आवडली. ओसाड शेत, औषध
खुप आवडली. ओसाड शेत, औषध आवडले.
अजय अनंत जोशी
रवि, 21/03/2010 - 09:04
Permalink
सुखातून दुःखे अशी भेटली की
सुखातून दुःखे अशी भेटली की गतीरोधकाहून खड्डे बरे
ही ओळ छान.
असे पाहिजे नी तसे पाहिजे यात आयुष्य हातातुनी चालले
घडू लागले ते बरे मानल्यावर जसे पाहिजे ते घडू लागले
युगे जाहली पण तुझी पावले आज दारात माझ्या थबकली पहा
कुठे सोडला धीर या चेहऱ्याने, हृदय फक्त हे धडधडू लागले
तसे प्रेम एकाचवेळी उमलले, सरकले पुढे आपले आपले
मला लागली आवडायास ती अन तिलाही कुणी आवडू लागले
असावे इथे औषधाच्याचपुरते असा काढला आज निष्कर्ष मी
सदा या जगाला कडू लागलो मी, सदा जग मला हे कडू लागले
हे शेर सुंदर..
रिकामाच होतो, सहज काढला आवरायास माळा मनाचा जरा
क्षणार्धात कुलुपे पुन्हा लावली मी, नको ते तिथे सापडू लागले
हा शेर लाजवाब..!
[नजरेतून ही गझल सुटली होती. क्षमस्व. सहज शोधताना सापडली.]
बेफिकीर
रवि, 21/03/2010 - 15:11
Permalink
क्षमस्व कसले? लक्षात आल्यावर
क्षमस्व कसले? लक्षात आल्यावर प्रतिसाद दिलात यासाठी आभार! (मी ही गझल रचली याचे मलाच आता नवल वाटत आहे... कारण मला स्वतःलाच ती बर्यापैकी आवडली बर्याच दिवसांनी वाचून... उदाहरणार्थ खालील शेर! हा हा हा!)
असे पाहिजे नी तसे पाहिजे यात आयुष्य हातातुनी चालले
घडू लागले ते बरे मानल्यावर जसे पाहिजे ते घडू लागले
सर्वांचे आभार!
अनिल रत्नाकर
रवि, 21/03/2010 - 20:03
Permalink
निघाले जसे गाव शहराकडे, शेत
निघाले जसे गाव शहराकडे, शेत ओसाड सारे रडू लागले
वास्तव,
अप्रतिम गझल.
गंगाधर मुटे
सोम, 22/03/2010 - 11:30
Permalink
सडे मुरवुनी आसवांचे,
सडे मुरवुनी आसवांचे, जमीनीतुनी वांझ बीजे खुडू लागले
निघाले जसे गाव शहराकडे, शेत ओसाड सारे रडू लागले
वा! व्वा!!
बाकी गझल आवडली.
आनंदयात्री
सोम, 22/03/2010 - 11:32
Permalink
आवडली गझल...
आवडली गझल...
चित्तरंजन भट
मंगळ, 23/03/2010 - 12:03
Permalink
असे पाहिजे नी तसे पाहिजे यात
असे पाहिजे नी तसे पाहिजे यात आयुष्य हातातुनी चालले
घडू लागले ते बरे मानल्यावर जसे पाहिजे ते घडू लागले
हा शेर चांगला आहे. विशेषतः खालची ओळ.
सुटे मिसरेही उत्तम आहेत. फार आवडले.उदाहरणार्थ:
मला लागली आवडायास ती अन तिलाही कुणी आवडू लागले
सदा या जगाला कडू लागलो मी, सदा जग मला हे कडू लागले
(वरच्या ओळीत औषधाऐवजी उपचार यायला हवे होते असे वाटून गेले)
एकंदर गझल चांगली झाली आहे.
बेफिकीर
मंगळ, 23/03/2010 - 14:07
Permalink
अनिल, गंगाधर, आनंदयात्री व
अनिल, गंगाधर, आनंदयात्री व चित्तरंजन!
मनापासून आभार!
ज्ञानेश.
मंगळ, 23/03/2010 - 16:59
Permalink
वावा ! ३,४,६ हे शेर सुरेख आले
वावा !
३,४,६ हे शेर सुरेख आले आहेत.
सातवा शेर सर्वोत्तम वाटला. विशेषतः दुसरी ओळ- प्रभावी कल्पना आहे !
ही गजल सुटली होती खरंच, माझ्याही वाचनातून !