पालखी
'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्या किती ओळखी
डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी?
आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)
आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी?
'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी!
दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी!
माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी?
आयुष्या, जगलो, तुला भोगले - ऐटीत, राजापरी
तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी
पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८.
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
मंगळ, 16/03/2010 - 22:17
Permalink
चक्रपाणि, गझल आवडली.
चक्रपाणि,
गझल आवडली.
श्यामली
मंगळ, 16/03/2010 - 23:09
Permalink
खोळंबली ना सखी>>या शेरातला
खोळंबली ना सखी>>या शेरातला सहजपणा फार आवडला
दुर्दैव..आणि पालखी हे पण शेर खूप आवडले
अजय अनंत जोशी
बुध, 17/03/2010 - 07:45
Permalink
आषाढा, बघतोस काय नुसते!
आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी?
'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! .... हा हा हा. मस्त.
मनासारखी, आणखी ... आवडले.
छान.
मतल्यात लगक्रम बदलला आहे असे वाटते.
क्रान्ति
बुध, 17/03/2010 - 10:05
Permalink
सुरेख गझल. आषाढ अगदीच
सुरेख गझल. आषाढ अगदीच अप्रतिम!!!!
ज्ञानेश.
बुध, 17/03/2010 - 11:29
Permalink
'विस्मरणे' आणि 'सखी' हे दोन
'विस्मरणे' आणि 'सखी' हे दोन शेर सुरेख वाटले !
जयश्री अंबासकर
बुध, 17/03/2010 - 14:11
Permalink
आषाढ, विस्मरणे.....जबरी
आषाढ, विस्मरणे.....जबरी !!
मक्ता पण खासच !!
प्रताप
शुक्र, 19/03/2010 - 22:32
Permalink
खुप आवडली. आषाढ, पालखी आवडले.
खुप आवडली. आषाढ, पालखी आवडले.
ऋत्विक फाटक
रवि, 21/03/2010 - 11:55
Permalink
आषाढा, बघतोस काय नुसते!
आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी?
दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी!
माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी?
वा:! मस्तच!
मानस६
रवि, 28/03/2010 - 11:11
Permalink
सगळेच शेर उत्तम आहेत,..काही
सगळेच शेर उत्तम आहेत,..काही ठिकाणी किंचीत अडखळल्यासारखे वाटले... उत्तम गझल
दुर्दैवा..खास
-मानस६
गणेश गव्हाणे
रवि, 28/03/2010 - 19:35
Permalink
तिरडीवर निजलो तरी मिरवले -
तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी
फारच छान तोड्च नाहि......
आनंदयात्री
बुध, 14/04/2010 - 22:23
Permalink
मस्त गझल... वा....
मस्त गझल...
वा....