ईश्काची गझल
वृत्तः आनंदकंद (गागालगा लगागा)
गुंतून मी पडावे की सोडवून घ्यावे
खड्गास या दुधारी सांगा कसे धरावे
गोडीत त्या गुलाबी गंधात धुंद झालो
बंदीस्त पद्मकोशी सांगा कसे सुटावे
पेल्यात वीख होते ओठात प्यास होती
ओठास तोषवावे व्याकूळ की मरावे
गोठून पार गेलो पाशात प्रेयसीच्या
आगीत लोळताना का गारठून जावे
जाऊ कसा फ़ुलांच्या अलवार बाहुपाशी
काट्यात सोलताना सांगा कसे हसावे
केली अखेर गल्ती ईश्कात गुंतण्याची
गुंतून पुष्पकोशी सारंग-दंग व्हावे
==========================
सारंग भणगे. (10 ऑगस्ट 2009)
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 01/02/2010 - 13:14
Permalink
गुंतून मी पडावे की सोडवून
गुंतून मी पडावे की सोडवून घ्यावे
खड्गास या दुधारी सांगा कसे धरावे
छान.
केली अखेर गल्ती ईश्कात गुंतण्याची
अशा ओळी वाचल्या की भाऊसाहेब पाटणकरच आठवतात.
बेफिकीर
सोम, 01/02/2010 - 13:33
Permalink
मला मतला नीट लक्षात आला
मला मतला नीट लक्षात आला नाही.
शब्दयोजना आवडली. रचना रंगीन व सरळ वाटली.
चु.भु.द्या.घ्या.
धन्यवाद!
अनिल रत्नाकर
सोम, 01/02/2010 - 14:27
Permalink
सुंदर शब्दयोजना. रचना रंगीन
सुंदर शब्दयोजना.
रचना रंगीन आहे हे तर खरेच. पण सरळ?
अखेरच्या शेरात दुधारी तलवार पेललीतच.
सारंग-दंग झालाच आहात तर पद्मकोशात रात्रभर अडकलात तर बिघडले कुठे?
आगीत लोळताना का गारठून जावे.......अर्थ वेगळा तर निघत नाही ना!
प्रेमळ प्रतिसाद.
लोभ असावा.
अजय अनंत जोशी
सोम, 01/02/2010 - 18:20
Permalink
गोठून पार गेलो पाशात
गोठून पार गेलो पाशात प्रेयसीच्या
आगीत लोळताना का गारठून जावे
सारंगाऽऽऽ आलास की वळणावर... :)
गुंतून मी पडावे की सोडवून घ्यावे
खड्गास या दुधारी सांगा कसे धरावे
वा! मस्त!
मला माझ्या ओळी आठवल्या...
धरून कोठे फिरू? असे ते -
शस्त्र नागवे दुधार होते
छान.
ह बा
मंगळ, 25/05/2010 - 17:47
Permalink
पेल्यात वीख होते ओठात प्यास
पेल्यात वीख होते ओठात प्यास होती
ओठास तोषवावे व्याकूळ की मरावे
गोठून पार गेलो पाशात प्रेयसीच्या
आगीत लोळताना का गारठून जावे
दोन्ही शेर अप्रतिम वाटले. गझल आवडली.
मिल्या
गुरु, 27/05/2010 - 18:54
Permalink
मतला आवडला
मतला आवडला