जुने, विसरून गेलेले...
-------------------------------------
कधी रडवून गेलेले, कधी हसवून गेलेले
पुन्हा का आठवावे ते, जुने विसरून गेलेले...
पुन्हा सारे तपासावे मला लागेल एकांती,
कधी जे वाटले होते मला समजून गेलेले
कसे चुकले जरा माझे, मला शिकवू नका कोणी,
पहा , चुकलेत ते सारे - मला शिकवून गेलेले
पुन्हा ती भेटली तेव्हा, जराशी वेगळी होती
इरादे वाटले आता, तिचे बदलून गेलेले..
दिलासा, सांत्वने, अश्रू, जिव्हाळा, प्रेम नी माया..
किती हे शब्द लेकाचे, मला फसवून गेलेले !
कुणी बिलगूनही नाही, मनाला वाटले प्यारे
कुणी लांबूनही होते, ठसा उठवून गेलेले...
कुणाचे श्वासही छातीत माझ्या मोजता यावे,
कुणी नाही , कुणी नाही , असे जवळून गेलेले
असावी वाट एखादी, दिशा छेदून जाणारी
दिसावे गाव एखादे, व्यथा हरवून गेलेले !
मला भेटायला आले, मला भेटून जातांना-
मला भेटायचे नाही , असे ठरवून गेलेले...
जरासे थांबले नाही, कुणी माझ्या चितेपाशी
जरा हेलावले नाही, मला उचलून गेलेले....
------------------------------------
प्रतिसाद
भूषण कटककर
शुक्र, 19/09/2008 - 12:55
Permalink
बाआआआस्स्स्स!
मान गये बॉस! अरे काय गझल का काय? अप्रतिम! कुठे भेटू शकाल आपण? आवश्यक आहे भेटणे! ठळक केलेल्या शब्दांमुळे मजा आली.
पुन्हा सारे तपासावे मला लागेल एकांती,
कधी जे वाटले होते मला समजून गेलेले
कसे चुकले जरा माझे, मला शिकवू नका कोणी,
पहा , चुकलेत ते सारे - मला शिकवून गेलेले ( हे फारच पटलं मला )
पुन्हा ती भेटली तेव्हा, जराशी वेगळी होती
इरादे वाटले आता, तिचे बदलून गेलेले.. ( खतरनाक शेर! मित्रांनो वाचा, साधी भाषा अन उच्च आषय)
दिलासा, सांत्वने, अश्रू, जिव्हाळा, प्रेम नी माया..
किती हे शब्द लेकाचे, मला फसवून गेलेले !
कुणी बिलगूनही नाही, मनाला वाटले प्यारे
कुणी लांबूनही होते, ठसा उठवून गेलेले...
कुणाचे श्वासही छातीत माझ्या मोजता यावे,
कुणी नाही , कुणी नाही , असे जवळून गेलेले ( अफाट! )
मला भेटायला आले, मला भेटून जातांना-
मला भेटायचे नाही , असे ठरवून गेलेले... ( मी खरच भेटायचे म्हणतोय)
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 19/09/2008 - 13:03
Permalink
व्वा
कुणी बिलगूनही नाही, मनाला वाटले प्यारे
कुणी लांबूनही होते, ठसा उठवून गेलेले...
क्या बात है
तसेच
मला भेटायला आले, मला भेटून जातांना-
मला भेटायचे नाही , असे ठरवून गेलेले...
हे ही सुंदर...
शेवटचा शेर नसता तरी चालले असते...
पुलस्ति
शुक्र, 19/09/2008 - 16:45
Permalink
वा!
ज्ञानेश, उत्तम गझल! बदलून, जवळून आणि ठरवून हे शेर मला विशेष आवडले!!
ज्ञानेश.
शुक्र, 19/09/2008 - 17:16
Permalink
आभार...
सर्वांचे मनःपुर्वक आभार !
ही गझल निर्दोष आहे का?
काही चुका असल्या तर जाणकारांनी निदर्शनास आणाव्या. मी पुढच्या गझलेत, अधिक सुधारणा करेन.
अजय अनंत जोशी
शुक्र, 19/09/2008 - 23:02
Permalink
मस्त.
सुंदर गझल. सुंदरच.
मला भेटायला आले, मला भेटून जातांना-
मला भेटायचे नाही , असे ठरवून गेलेले...
प्रदीप कुलकर्णी
रवि, 21/09/2008 - 16:29
Permalink
सुंदर...
कसे चुकले जरा माझे, मला शिकवू नका कोणी,
पहा , चुकलेत ते सारे - मला शिकवून गेलेले
उत्तम...
पुन्हा ती भेटली तेव्हा, जराशी वेगळी होती
इरादे वाटले आता, तिचे बदलून गेलेले..
छान...
दिलासा, सांत्वने, अश्रू, जिव्हाळा, प्रेम अन् माया..
किती हे शब्द लेकाचे, मला फसवून गेलेले !
सुंदर...
कुणाचे श्वासही छातीत माझ्या मोजता यावे,
कुणी नाही , कुणी नाही , असे जवळून गेलेले
वा...वा...वा...
शुभेच्छा...
आजानुकर्ण
सोम, 22/09/2008 - 03:10
Permalink
वा वा
जरासे थांबले नाही, कुणी माझ्या चितेपाशी
जरा हेलावले नाही, मला उचलून गेलेले....
फारच सुरेख गझल. छान.
अमोल शिरसाट
सोम, 22/09/2008 - 20:19
Permalink
बहोत खुब...!
पुन्हा ती भेटली तेव्हा, जराशी वेगळी होती
इरादे वाटले आता, तिचे बदलून गेलेले..
दिलासा, सांत्वने, अश्रू, जिव्हाळा, प्रेम नी माया..
किती हे शब्द लेकाचे, मला फसवून गेलेले !
कुणी बिलगूनही नाही, मनाला वाटले प्यारे
कुणी लांबूनही होते, ठसा उठवून गेलेले...
अमोल शिरसाट, संवेदना रायटर्स कम्बाईन, मिलिंद विद्यालय,कमला नगर, वाशिम रोड ,बायपास,अकोला.भ्रमणध्वनी क्रं ९०४९०११२३४
भूषण कटककर
सोम, 17/11/2008 - 23:53
Permalink
अप्रकाशित शेर!
आपल्या पुण्यातील अभियंता मित्राने मला आत्ताच या गझलेतील आपला अप्रकाशित शेर ऐकवला. व्वाह! क्या बात है! आगे बढो बॉस!
काय शेर आहे!
कुणाचा लोभही नाही कुणाशी वैरही नाही
मला घेऊन गेलेले मला वगळून गेलेले
व्वाह! मला घेऊन गेलेले मला वगळून गेलेले! क्या बात है!
हा आपण प्रकाशित का केला नाहीत?
भूषण कटककर
मंगळ, 18/11/2008 - 00:16
Permalink
चकवून गेलेले!
एक आपली माझी ऍडिशन!
जरी चुकलोच वाटा, पोचलो, जेथे हवे तेथे
पुन्हा मग भेटले सारे मला चकवून गेलेले
ज्ञानेश.
मंगळ, 18/11/2008 - 09:29
Permalink
आभार..
भुषणजी, माझा अप्रकाशित शेर पुन्हा प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहे. हा शेर त्यावेळी प्रकाशित न करण्याचे कारण म्हणजे वृत्ताची साशंकता आणि प्रतिसादांची भिती...
'चकवून' हा शेर जमून आला आहे. गझलेच्या प्रकृतीशी सुसंगत आहे. अभिनंदन!
चांदणी लाड.
गुरु, 21/05/2009 - 14:16
Permalink
किती हे शब्द लेकाचे, मला फसवून गेलेले !
ज्ञानेश मानले तुम्हांला, माझ्या आवडत्या गझलेपैकी ही एक. सगळेच शेर मनाला भिडून गेलेले.
कधी रडवून गेलेले, कधी हसवून गेलेले
पुन्हा का आठवावे ते, जुने विसरून गेलेले...
पुन्हा सारे तपासावे मला लागेल एकांती,
कधी जे वाटले होते मला समजून गेलेले
दिलासा, सांत्वने, अश्रू, जिव्हाळा, प्रेम नी माया..
किती हे शब्द लेकाचे, मला फसवून गेलेले !
कुणी बिलगूनही नाही, मनाला वाटले प्यारे
कुणी लांबूनही होते, ठसा उठवून गेलेले...
सोनाली जोशी
गुरु, 21/05/2009 - 17:59
Permalink
वा
कुणाचे श्वासही छातीत माझ्या मोजता यावे,
कुणी नाही , कुणी नाही , असे जवळून गेलेले
वा हा शेर फार आवडला.
सोनाली
निलय
गुरु, 24/12/2009 - 12:09
Permalink
काय म्हणायचे या गझलेला..
काय म्हणायचे या गझलेला.. काहीच म्हणू नये, फक्त वाचावे निवांतपणी...
Masterpeice -
मला भेटायला आले, मला भेटून जातांना-
मला भेटायचे नाही , असे ठरवून गेलेले...
हेमंत पुणेकर
शुक्र, 25/12/2009 - 00:56
Permalink
अप्रतीम गझल आहे ज्ञानेश! खुप
अप्रतीम गझल आहे ज्ञानेश! खुप सुंदर! सर्वच शेर उत्तम आहेत पण हे शेर तर खुपच खास:
कसे चुकले जरा माझे, मला शिकवू नका कोणी,
पहा , चुकलेत ते सारे - मला शिकवून गेलेले
दिलासा, सांत्वने, अश्रू, जिव्हाळा, प्रेम नी माया...
किती हे शब्द लेकाचे, मला फसवून गेलेले !
मला भेटायला आले, मला भेटून जातांना-
मला भेटायचे नाही , असे ठरवून गेलेले........खास तर हा शेर."मला भेटणे" ह्याच्या सर्व शक्यतांचा जो खेळ मांडला आहे त्याचा अंदाजे-बयां शब्दातीत आहे...वाह!
चित्तरंजन भट
रवि, 27/12/2009 - 12:32
Permalink
आधी प्रतिसाद द्यायचे राहून
आधी प्रतिसाद द्यायचे राहून गेले होते. वा! एकंदर अगदी चांगली झाली आहे गझल.
मला भेटायला आले, मला भेटून जातांना-
मला भेटायचे नाही , असे ठरवून गेलेले...
हा शेर व ह्यातला खेळ विशेष आवडला.
विश्वनाथ तु. साळेकर
बुध, 30/12/2009 - 14:01
Permalink
अप्रतीम गझल आहे ज्ञानेश! खुप
अप्रतीम गझल आहे ज्ञानेश! खुप सुंदर! सर्वच शेर उत्तम आहेत
वैभव देशमुख
रवि, 10/01/2010 - 15:42
Permalink
सु॑दर गझल.....
सु॑दर गझल.....
आनंदयात्री
बुध, 24/03/2010 - 10:39
Permalink
वाचायची राहिली होती
वाचायची राहिली होती ही!!!!
अप्रतिम....
मान गये बॉस!!!
वैभव जोशी
बुध, 24/03/2010 - 13:17
Permalink
आज संपूर्ण आवडलेली ही दुसरी
आज संपूर्ण आवडलेली ही दुसरी गझल. सकाळपासून बरेचदा वाचून झाली
सुंदर ज्ञानेश . अभिनंदन व शुभेच्छा
ऋत्विक फाटक
बुध, 24/03/2010 - 22:31
Permalink
अफलातून! केवळ अफलातून!
अफलातून!
केवळ अफलातून!
कैलास
बुध, 24/03/2010 - 22:38
Permalink
मास्टरपीस.. डॉ.कैलास
मास्टरपीस..
डॉ.कैलास