वादळे उसळून आल्यावर....
एवढे होऊनही म्हणते,
चांगल्यासाठीच हे घडते
येऊनी समजावतो जो तो
'सोड, जाऊ दे, असे घडते'
सर्व नेतो दूर जाणारा
...सावलीही रे कुठे उरते ?
प्रश्न आहे नेहमीचा हा -
मीच दरवेळी कशी चुकते ?
वादळे उसळून आल्यावर...
कागदाला लेखणी भिडते !
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
बुध, 08/07/2009 - 15:40
Permalink
खरे आहे केदार
वादळे उसळून आल्यावर
कागदाला लेखणी भिडते - व्वा!
सुंदर, सुबक गझल!
एकदा 'चहा घेऊ... बसू बोलत' प्रत्यक्षात आणायला हवे.
अभिनंदन! सुरेख रचना!
मानस६
बुध, 08/07/2009 - 21:11
Permalink
लहान बहरातील चांगली गझल
केदार ,
लहान बहर संभाळुन एक चांगली, अर्थपूर्ण गझल सादर केलीय.. अजून येऊ द्यात.. पु. ले. शु.
-मानस६
ज्ञानेश.
शुक्र, 10/07/2009 - 10:46
Permalink
छान.
केदार- बर्याच दिवसांनंतर लिहिलेस.
छान गझल.
मतला आणि मक्ता फार आवडला.
वादळे उसळून आल्यावर
कागदाला लेखणी भिडते..
(चवथा शेर दिसत नाहीये.)
केदार पाटणकर
शुक्र, 10/07/2009 - 16:23
Permalink
आभारी
नेहमीप्रमाणे आभारी प्रतिसादांबद्दल.
ज्ञानेश,
प्रश्न आहे नेहमीचा हा -
मीच दरवेळी कशी चुकते ?
हा चौथा शेर.
.केदार पाटणकर
ज्ञानेश.
शुक्र, 10/07/2009 - 19:57
Permalink
?
आता तर अजिबात काहीच दिसत नाहीये.
(कॉपी- पेस्ट करू नकोस, आणि अन्य मराठी सॉफ्टवेअर वापरत असल्यास ते बंद करून टाईप कर.)
अजय अनंत जोशी
सोम, 13/07/2009 - 10:27
Permalink
प्रश्न आहे नेहमीचा
प्रश्न आहे नेहमीचा हा -
मीच दरवेळी कशी चुकते ? .. विचार करायला लावणारा शेर.
वादळे उसळून आल्यावर...
कागदाला लेखणी भिडते ! .. एकदम खरे!
कलोअ चूभूद्याघ्या
केदार पाटणकर
गुरु, 16/07/2009 - 11:43
Permalink
धन्यवाद
धन्यवाद अजय.
.केदार पाटणकर
दशरथयादव
गुरु, 16/07/2009 - 16:43
Permalink
लेखन
भन्नाट...
वादळे उसळून आल्यावर...
कागदाला लेखणी भिडते !
क्रान्ति
गुरु, 16/07/2009 - 23:04
Permalink
सुंदर!
सगळीच गझल आवडली.
हे शेर खास!
प्रश्न आहे नेहमीचा हा -
मीच दरवेळी कशी चुकते ?
वादळे उसळून आल्यावर...
कागदाला लेखणी भिडते !
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}
जयन्ता५२
गुरु, 16/07/2009 - 23:38
Permalink
सर्व नेतो दूर जाणारा
सर्व नेतो दूर जाणारा
...सावलीही रे कुठे उरते ?
---- खरं आहे, केदार, काळीजस्पर्शी गझल! जियो.
जयन्ता५२
केदार पाटणकर
सोम, 27/07/2009 - 15:09
Permalink
धन्यवाद
धन्यवाद क्रांती, जयंतराव व दशरथराव...
.केदार पाटणकर
चित्तरंजन भट
सोम, 27/07/2009 - 18:47
Permalink
छान बोलकी गझल
केदारराव, छान बोलकी गझल.
चक्रपाणि
गुरु, 30/07/2009 - 02:17
Permalink
असेच म्हणतो
- चक्रपाणि जीवन चिटणीस
ॐकार
रवि, 23/08/2009 - 16:36
Permalink
एवढे होऊनही
एवढे होऊनही म्हणते,
चांगल्यासाठीच हे घडते
येऊनी समजावतो जो तो
'सोड, जाऊ दे, असे घडते'
वा वा ! क्या बात है!
ह्या दोन शेरांतच पुढ्चे शेर झाकोळून गेले!
पुलस्ति
मंगळ, 25/08/2009 - 21:01
Permalink
वा! मस्तच गझल!! २, ३ हे शेर
वा! मस्तच गझल!!
२, ३ हे शेर आवडले...
अलखनिरंजन
शुक्र, 28/08/2009 - 20:04
Permalink
सुंदर छोट्या बहरची
सुंदर छोट्या बहरची गझल!
"वादळे उसळून आल्यावर" या ऐवजी "वादळे उसळून आली की" असे चालेल का?
म्हणजे हे असे दरवेळी घडते, सवय आहे, असा अर्थ होतो :)
चूभूदेघे.
केदार पाटणकर
मंगळ, 22/09/2009 - 14:47
Permalink
अलख निरंजन, आपण सुचविलेला बदल
अलख निरंजन,
आपण सुचविलेला बदल चांगलाच आहे.
मी त्या बदलासह तो शेर पुन्हा पुन्हा म्हणून पाहतो आहे.
आपल्या शब्दयोजनेमुळे प्रसादगुणात काय फरक पडतो, हे तपासतो आहे.
अवांतरः आपले नाव वाचताच डोळ्यांसमोर दाराबाहेर कमंडलू घेतलेली दाढी असलेली भगवी छबी उभी राहतेः)
प्रतिसादवाचकाकडून हशा अपेक्षित.
ज्यांच्याबद्दल उद्गार आहेत , त्यांच्याकडूनही हशा अपेक्षित.
बेफिकीर
मंगळ, 22/09/2009 - 15:03
Permalink
हसलो. बेफिकीर हासलो. खी:
हसलो.
बेफिकीर हासलो.
खी: मनाचे श्लोक झाल्यावर ( माफ करा... झालेकी )
ती छबीसुद्धा गझल करते...
-सविनय
बेफिकीर!
बेफिकीर
मंगळ, 22/09/2009 - 15:07
Permalink
कोयनेने शेर रचलेले त्यात
कोयनेने शेर रचलेले
त्यात शिवथरघळ बदल करते
-सविनय
बेफिकीर!